नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १४९ तर शहरात १८ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ७८१
नाशिक -आज नाशिक जिल्ह्यात एकूण १४९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या १८ झाली आहे.तर जिल्ह्यात आज ५३ जण कोरोना मुक्त झाले.आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज २ मृत्यू झाला आहे. आज ९४६ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.७० % झाली आहे.आज जवळपास ३८४ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण २ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०१ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०१ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १८ तर ग्रामीण भागात १२६ मालेगाव मनपा विभागात ०१ तर बाह्य ०४ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९८.१६ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ७८१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २६० जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नो डल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.