मटकीचे आरोग्यास फायदे

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 

मटकी ही अतिशय प्रसिध्द सर्वत्रच…खव्वयांना मटकी शिवाय होत नाही असे म्हटले तरी चालेले…आणि आता तर सर्वत्र मिसळ चा उदो उदो चालू असल्याने मटकीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे..जेवढी मटकी ची मागणी वाढली तेवढे पचनशक्ती कमकुवत असताना मटकी खाल्ल्याने होणारे आजाराचे रुग्ण वाढीस लागले आहे हे म्ह्टले तर अतिशयोक्ती होणार नाही.

आज घराघरात मटकी प्रचलीत आहे. आता तर मोठ्या मोठ्या शहरात घरीच मोड आणून मटकी खाण्यापेक्षा बाहेरील मोड आणलेले पॅकेट्स घेण्यात धन्यता मानणारा वर्ग देखील आहे.असो..महाराष्ट्रात उसळी करीता प्रसिध्द असा प्रकार उत्तर प्रदेशात दालमोठ नावाने प्रसिध्द आहे.मटकीला मोड आणून खाण्याची पध्दत प्रोटीन मिळतात या नावाखाली रुढ असली तरी ती सर्वथा अयोग्य .याने आतड्यातीलपाण्याचे प्रमाण अतिरिक्त प्रमाणात वाढवून जंताची निर्मीती करण्याचा स्वभाव आहे.व सोबत अतिरिक्त पाणी असल्यास अजून वाईट.या मटकीचे लाभ-तोटे पाहूयात.

१.लघवीवाते रक्त जाणे,नाकातून रक्त येणे यात मटकीचे पाणी द्यावे.

२.हिरड्या सूजणे,रक्त येणे,यात मटकी वाटून त्याचा लेप केल्यास लाभ होतो.

३.पित्ताच्या तापावर मटकीचे पाणी पिण्यास द्यावे.

४.पित्ताच्या तापात पोटात उष्णता जाणवल्यास ,पोटाचा स्पर्श गरम असल्यास,शौचास पसरट होत असल्यास वापर करावा.

सावधान…

१.भूक कमी असणे,पचनशक्ती चांगली नसणाऱ्यांनी मटकी खावू नये

२.जंताच्या रुग्णांनी मटकी खावू नये,

३,रोजच्या वापरात मटकी नसावी.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी
औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.