सातूचे पीठ पौष्टिक असते. यात भरपूर पोषणमूल्ये असतात.मध्य प्रदेशात आणि बिहारमध्ये आजही प्रखर उन्हात जाण्यापूर्वी पाण्यात मिसळलेल्या सत्तूच्या पिठाचे पातळसर पेय पिऊन जाण्याची प्रथा आहे.जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-” सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।”असे याबद्दल म्हणतात…
साहित्य – अर्धा किलो गहू, दाळ्या २५० ग्रॅम, सुंठ १० ग्रॅम, ५ ते ६ वेलची, जिरे १ चमचे, चवीपुरता मीठ
कृती – गहू अगोदर पाण्याने धुऊन सुती कापडाने कोरडे करून घेणे, त्यानंतर खरपूस भाजून घेणे, नंतर दाळ्या ४ ते ५ मिनिटे कमी आसेवर भाजून घेणे , त्यात सुंठ वेलची जिरे टाकून हे मिश्रण एकत्र करून थंड झाल्या वर त्यात थोडे मीठ टाकून घरी किंवा गिरणी मध्ये दळून हवाबंद डब्यात भरून ठेवणे.आणि पाणी किंवा दुधात गूळ टाकून हे तयार पीठ कालवूनआपण खाऊ शकतो ,यापासून आपण थालीपीठ,लाडू,शिरा सुद्धा बनवू शकतो.
हे सातू चे पीठ उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे पारंपरिक आणि पौष्टिक पचायला हलके असे सातू चे पीठ
सोनाली आहेर
(बेकर आणि केक डिझाइनर)
सर्व प्रकारचे केक आणि कप केक तयार करून मिळतील संपर्क – “द केक हाऊस” मोबाईल नंबर – 91 82650 07879