लोकचित्र संगम कलामहोत्सव तिसऱ्या चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न

0

नाशिक,१७ ऑगस्ट २०२३ – भारतीय संस्कृतीचे जतन,संवर्धन लोकचित्रां‌मधून अनेक शतके सुरु आहे. काही कला लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. कलाकार विविध कलांचा अभ्यास करून कलानिर्मिती करतात. रसिकांनी त्याचा आस्वाद घेऊन पुढच्या पिढीपर्यंत पिढ्यांपर्यंत हे कलावैभव पोहोचवावे त्याने कलाकारांना बळ मिळेल असे प्रतिपादन डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले. तिसऱ्या लोकचित्र प्रदर्शनाच्या उदघाट्नप्रसंगी त्या बोलत होत्या.

वारली आर्ट फाउंडेशनतर्फे लोकचित्र संगम कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच दि. १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हा अनोखा उपक्रम नाशिकरोडच्या पु. ना. गाडगीळ शोरूममधील कलादालनात सुरु आहे. त्यात भारतातील विविध वैशिष्ट्यपूर्ण लोकचित्र शैलीतील आकर्षक कलाकृतींचा समावेश असून एकूण २५ कलाकार सहभागी झाले आहेत. संकल्पना व संयोजन पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांचे आहे. पहिल्या दोन्ही प्रदर्शनांना कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील तिसऱ्या चित्र प्रदर्शनाचे उदघाट्न गुरुवारी (दि. १७) झाले.

सायंकाळी ५ वाजता झालेल्या कार्यक्रमाला एमईटी – भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य प्रबंधक व चित्रकर्ती डॉ. शेफाली भुजबळ, छायाचित्रकार व जनस्थान समूहाचे अध्यक्ष अभय ओझरकर, कर्नल मोहन आशर,आणि कलाप्रेमी अंजू आशर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. दि. १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या तिसऱ्या प्रदर्शनात अपूर्वा भंडारे, सुप्रिया जोशी, देविका काशीकर, स्नेहल बंकापुरे, आदिती पळसुले आणि संजय देवधर यांची विविध राज्यांच्या शैलीतील सुमारे ६० सुंदर चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक संयोजक संजय देवधर यांनी केले. ते म्हणाले, या सर्व लोककलांचे

समानसूत्र म्हणजे त्यात निसर्ग, पर्यावरण, सभोवताल यांच्यापासून प्रेरणा घेतलेली असते. नैसर्गिक रंग – साहित्याचा वापर केलेला आसतो व माणूस हाच चित्रांचा केंद्रबिंदू असतो असे त्यांनी नमूद केले. देविका काशीकर यांनी‌ प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कलाकारांच्या वतीने स्नेहल बंकापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र वामनाचार्य यांनी वारली चित्रशैलीवर आधारित पोस्टकार्डाची‌ माहिती दिली. मेघा पिंपळे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. अपूर्वा भंडारे यांनी आभार मानले.

दि.२४ ते ३१ ऑगस्ट या चौथ्या व शेवटच्या प्रदर्शनात पद्मजा ओतूरकर, माधवी पाठक, श्रद्धा रावळ, निवेदिता पोतदार व स्मिता गांगल यांच्या चित्रांचा समावेश असेल. हा संपूर्ण कलामहोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कलारसिकांनी चित्रप्रदर्शनाला उपस्थित राहून कलाकृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजक संजय देवधर व सर्व सहभागी कलाकारांनी केले आहे. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनात विविध लोकचित्रशैलींची रसिकांना मेजवानी मिळत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैली सुपरिचित आहे. त्या खालोखाल बिहारची मधुबनी कला रसिकांना माहिती आहे. पण फारश्या माहिती नसणाऱ्या अनेक कलांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. चित्रे खरेदी करता येतील.

Inauguration of third exhibition of Folk Chitra Sangam Art Festival

वारली चित्रशैली प्रशिक्षण कार्यशाळा
या कला महोत्सवात एक दिवसीय वारली चित्रशैली प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. १९ व २० रोजी वारली कलेचे बेसिक प्रशिक्षण दिले जाईल. दि.२६ व २७ रोजी ऍडव्हान्स कार्यशाळा होईल. त्यात कापड व मातीच्या भांड्यावर वारली चित्रे रंगविण्याचे प्रशिक्षण मिळेल. १० वर्षावरील मुले – मुली व कलाप्रेमी स्त्री पुरुषांना सशुल्क सहभागी होता येईल. प्रवेश मर्यादित असून ९४२२२७२७५५ या क्रमांकावर नावनोंदणी करावी.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.