नाशिक – नाशिककरांच्या चिंता वाढणारी गोष्ट समोर आली आहे. रँडम तपासणी मध्ये गेलेल्या जेनॉम् सिक्वेंसिंग मध्ये नाशिक शहरातील पहिला ओमायक्रोन रुग्ण आढळून आलेला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली
हा रुग्ण नॉन सिम्प्टमिक असून त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु या व्हरिएंट च्या प्रसाराची गती विचारात घेता कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरची सर्व तत्व स्वतःहूनच व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे. स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे उरलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःचे लसीकरण करून घ्यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.