जनस्थान पुरस्काराचे आज वितरण : सोहळ्याचे फेसबुक वरून थेट प्रक्षेपण

0

नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठाचा सन २०२१ चा जनस्थान पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना आज प्रदान करण्यात येणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षा आड दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार म्हणजे साहित्य क्षेत्रात असामान्य कामगिरी करून भारतीय समाजाचे साहित्य जीवन समृद्ध करणा-या महनीय व्यक्तींना प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार असतो. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री नरेंद्र चपळगावकर याच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी आयोजित केलेला जनस्थान पुरस्कार समारंभ स्थगित केला होता आता हा पुरस्कार आज शनिवार दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी सायं. ५ वाजता कुसुमाग्रज स्मारकात विशाखा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार व कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम निमंत्रित ४० ते ५० निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. इतर श्रोत्यासाठी हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान ह्या फेस बुक पेजवरून ऑन लाईनही असणार आहे.असे कुसुमाग्रज प्रातिष्ठान तर्फे कळविण्यात आले आहे.

खालील लिंक वर सोहळा बघता येईल 

https://youtu.be/5XmXHPqnKTc

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.