नाशिकरोडच्या जय भवानी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार:घटना सीसी टीव्ही मध्ये कैद

व्हिडिओ पहा

0

नाशिक,दि,३ एप्रिल २०२४ –नाशिकरोड परिसरातील जयभवानी रोड वरील लोणकर मळा मुख्य रस्त्यावर मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे.एका सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये बिबट्या कैद झाल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांने जयभवानी रोड वरील लोणकर मळा, मुख्य रस्त्यावर कुत्र्यांचा जोरदार भुकण्याचा आवाज आल्याने काही रहिवाशांना जाग आली. त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता फर्नांडीस वाडी कडून आत लोणकर मळा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता.

पाच,दहा मिनिटांनंतर बिबट्या पुन्हा माघारी फिरला मात्र जाताना बिबट्या काही कुत्र्याच्या दिशेने धावला काहीही हती न लागल्याने त्याच्या हातून शिकार हुकली.हा सर्व प्रकार येथील राहिवासी संदीप लोणकर यांच्या बंगल्यातील सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.या भागातील सामाजिक कार्यकर्ते ऍड नितीन पंडीत यांनी याबाबत वन विभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क केला.बिबट्या च्या मुक्त संचारा मुळे राहिवसी, नागरिकांत भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडिओ पहा 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.