६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत २१ डिसेंबर रोजी अर्थनीती फाउंडेशन – नाशिक संघातर्फे सेलिब्रिटी हे नाटक सादर करण्यात आले. एका अभिनेत्रीच्या आयुष्यातील चढ उतारांची ही एक विलक्षण कहाणी आहे. एक प्रतिथयश अभिनेत्र. रूपाली देशमुख तिच्या पडत्या काळात तिला भूमिका मिळेनाशा होतात. वयोमानाप्रमाणे तिच्या दिसण्यात ही बदल होत जातो. पण हे ती मान्यच करत नाही. त्यामुळे ती काहीशी एकलकोंडी बनली आहे. विक्षिप्त वागते आहे. आपल्या सेलिब्रिटी असण्याचा मोह तिला आवरला गेला नाही. आपण सतत सेलिब्रिटी असावं यासाठी तिची धडपड चालू असते. वेगवेगळ्या पद्धतीने ती प्रयत्न करते.आणि यासाठी ती एका लेखकाची बॅाबी भोयर याची मदत घेते. हा लेखक वैदर्भीय आहे त्यामुळे त्याची भाषा थोडी वेगळी आहे.रूपाली त्याला स्वतः च्या आयुष्याची गोष्ट लिहायला सांगते आणि त्यावर आपण सिनेमा तयार करू असेही सांगते.
पण प्रत्यक्षात काही तरी वेगळेच घडते ! तिची कथा पूर्ण होते का ? त्या लेखकाचं काय झालं? ते एकमेकांशी कसे वागतात?त्यांच्यातील नातं कुठलं वळण घेतं? या नाटकात भावनांचे चढउतार सतत आपल्या समोर येत राहतात आणि आपण नकळतपणे त्यात गुंतत जातो. हल्लीच्या मनोरंजन सृष्टीत नेहमी घडणाऱ्या गोष्टी लेखकाने इथे अप्रतिमपणे मांडलेल्या आहेत.
विद्या करंजीकर यांनी प्रभावीपणे आपल्या दिग्दर्शनाचा ठसा नाटकाच्या माध्यमातून उमटवला आहे. लक्ष्मी पिंपळे यांनी आपल्या सशक्त अभिनयाने रूपाली देशमुख हे पात्र उभे करून प्रेक्षकांचे दाद मिळवली . नाटकाला पूरक असे संगीत सुनील देशपांडे यांनी दिलेला आहे. उत्कृष्ट प्रकाश योजनेद्वारे कलाकारांचा अभिनय प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर विनोद राठोड यांनी मांडला आहे.
नाटकाचे लेखन निरंजन मार्केंडेयवार तर दिग्दर्शन विद्या करंजीकर यांचे होते. नाटकात रूपाली देशमुख – लक्ष्मी पिंपळे, बॅाबी भोयर – सनी धात्रक यांनी भुमिका सकरल्या. प्रकाशयोजना विनोद राठोड तर संगीत सुनिल देशपांडे यांचे होते. संगीत संयोजन ओम देशमुख तर नेपथ्य शैलेंद्र गौतम यांचे होते. रंगभूषा माणिक कानडे तर वेशभूषा स्नेहल एकबोटे यांची होती. रंगमंच व्यवस्था संगीता साबळे, समाधान मुर्तडक यांचे होते. विशेष सहकार्य श्री. प्रशांत साठे, ललित निकम, नुपूर सावजी,अनुजा ओढेकरयांचे लाभले.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – त्याने आईचा ऐकलं
लेखक-दिलीप जगताप
दिग्दर्शक -रोहित पगारे
संस्था – अमृततुल्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था,नाशिक