वासंतिक वमनामुळे दमा,थायरॉईड,त्वचा विकारासह अनेक समस्या दूर होणार !

डॉ.राहुल रमेश चौधरी

0

डॉ. राहुल रमेश चौधरी 
आजकाल पंचकर्म  बद्दल खूप माहिती अनेक वृत्तपत्रे तसेच डिजिटल मीडीया वर आपण सर्व जण बघत असतात…ऐकत असतात…अनेक वेळा हि माहिती ऐकून काही उत्साही व आरोग्याची काळजी करणारे लगेच काही विचार न करता मोठमोठ्या पंचकर्म  केद्रावर करूनही घेतात….अनेक वेळा काहीही तपासणी न करता केलेले पंचकर्म  त्रासदायक देखील ठरतात…आणि रुग्ण आयुर्वेद योग्य नाही असे म्हणन्यास देखील कचरत नाही.असो हा काही आपल्या लेखाचा आजचा मुद्दा नाही…आजचे लेखाचे शिर्षक वाचून वाचक वर्गाला स्वाभाविक प्रश्न पडला असेल् की वमन हे नाव ऐकल आहे पण वासंतिक हा शब्द काही परिचयाचा नाही…आज आपण याच वासंतिक वमन या पंचकर्म प्रकारापैकी एका प्रकाराची आज आपण माहिती घेऊ्यात..

१.वासंतिक वमन म्हणजे काय?
-वसंत ऋतुत जो पंचकर्म प्रकार केला जातो त्यास वासंतिक हा शब्दप्रयोग आलेला आहे.वसंत ऋतूत कफ दोष शरीरात साचतो..म्हणजेच कफ दोषाचा प्रकोप होतो तोच  वाढलेला कफ शरीराबाहेर उलटीवाटे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला वासंतिक वमन म्हणतात.

२.वमन  या पंचकर्म प्रकाराची सम्पूर्ण प्रक्रिया कशी असते?
-वमन हा एक पंचकर्म चा एका प्रकार आहे..व हा मुख्यत: कफ दोष विकाराकारिता केला जातो .यामध्ये सर्वप्रथम रुग्णाने आयुर्वेद तज्ञ वैद्याकडून आपण वमन  करण्यास योग्य आहोत की नाही हे तपासूना घेणे गरजेचे आहे..तसेचा सुरुवातीला आवश्यकतेनुसार   शरीरातील घाणेरड्या घटकाचे पचन करून घेणे अत्यावश्यक  आहे.असे केह्ले तरच हा प्रकार उपचाराकरीता यशस्वी होतो.योग्य पद्धतीने पाचन झाल्यानंतर यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्नेहपान…याकरीता स्नेहपान म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ्यात..वमन अथवा  विरेचन हे पंचकर्म यशस्वी करायचे असतील तर स्नेहपान योग्य होणे महत्वाचे आहे.स्नेहपान म्हणजे औषधी तूप तेल वसा मज्जा पचन क्षमतेनुसारा सेवन करणे वा स्नेहपान पूर्ण झाल्याची लक्षणे दिसल्यानंतर बंद  करणे.स्नेहपांना ची योग्य लक्षणे दिसल्यानंतर वमन विधी करिता 1 दिवसांचा विश्राम देऊन त्यानंतर मुख्य भाग उपचाराचा मुख्य भाग सुरु होतो.यात रुग्णास औषधी द्रव्याचा मसाज व वाफारा देऊन औषधी द्रव्याचे चाटण व काढा देऊन दोष उलटीवाटे शरिराबाहेरा काढले जातात.त्यानंतर औषधी द्रव्याचा धूर ओढायला लावूना उर्वरीत कफ शरिरा बाहेर काढला जातोत्यानंतर  संसर्जन क्रम म्हणजे वमननंतर पाळावयाचा पथ्यकर आहार दिला जातो.

३.वमन कोणता व्यक्ती घेऊ शकतो?
– वमन स्वस्थ व्यक्ती व रुग्ण दोघेही घेऊ शकतात.स्वस्थ व्यक्तीने वर्षातून १ वेळा तरी वमन घेतले पाहिजे

४.वमनास योग्य रुग्ण कोण?
– जुनाट सर्दी पडसे
-सर्व प्रकारचे त्वचा विकार
-क्षयव्याधी
-दमा
-थायरॉईड
-प्रमेह
-विरुद्ध आहाराने होणारे अजिर्न
-मानस आजार
-अम्लपित्त
-कान फूटून कानातून पाणी येणे
-वंध्यत्व-पाळीच्या तक्रारी
-निरुत्साहा-भूक न लागणे
-लहान मुलांच्या तक्रारी
-अंगावर पित्त येणे
-घसा ,कंठ विकार
-सर्व कफ विकार
-अतिनिद्रा
-मेदाचे विकार
इत्यादी सर्व प्रकारच्या विकार वमन करण्यास योग्य आहे

५.वमनाकरिता कोण अयोग्य आहे ?
-अतिजाड,अतिबारीक व्यक्ती
-बालक,वृद्ध,दुबळा,अति थकलेले व्यक्ती
-उपवास करणारे,अत्यधिक मैथुन,व्यायाम,अभ्यास,चिंता, करणारे
-गर्भिणी
-ह्रदय  विकार
-नुकतेच बस्ती घेतलेले
-उलटी अजिबात न होणारे
-वात व्याधी
-कृमी कोष्ठ
-कान,डोके,डोळे दुखणे
-मूळव्याध
अश्या प्रकारच्या आजारात वमन करू नये

Many problems including asthma, thyroid, skin disorders will be removed due to Vasantika Vamana!

६.वमना करिता किती कालावधी लागतो ?
– वमन पंचकर्म  हे स्नेहपान किती दिवस चालणार आहे त्यावर अवलंबून असते
स्नेहपान जास्तीत जास्त ७ दिवसापर्यत करता येते,स्नेहपान हे पचन क्षमतेवर अवलंबून असते.त्यानुसार वैद्य स्नेहा चे मात्रा ठरवतात.स्नेहांची मात्रा सर्वाकरीता समान नसते.

७.वमन  कर्म हे किती वेळ सुरु असते ?
– योग्य पद्धतीने स्नेहपान  झाल्यानंतर वमन करिता 1 दिवसाचा अवकाश दिला जातो.त्या दिवशी शेक ,मसाज दिला जातो व जेवण हे पूर्ण कफ वाढवण्याकरिता असते.दुसऱ्या दिवशी म्हणजे वमन दिवशी सकाळी पुन्हा मसाज,वाफारा देऊन उलट्या पित्त पडेपर्यत केले जाते…त्यानंतर वमन थांबवले जाते.

८.वमन पूर्ण झाल्याच्या परीक्षा कोणत्या ?
– वमन  पूर्ण झाले हे ओळखण्याकरीता ४ परीक्षा आहेत.
अ) लैंगिकि- ही लक्षण परीक्षा असते…म्हणजे रुग्णास हलके वाटणे,ह्रदय -शिर -छाती या ठिकाणी हलकेपणा जाणवाने, मन प्रसन्न असणे इत्यादी
ब)आंतिकी -वमन शेवटी पित्त पडणे हे अंतिकी परीक्षा चे लक्षणा आहे
क)मानिकि- मानिकी म्हणजे वमन केल्यानंतर जे द्रव्य रुग्ण उलटीद्वारे बाहेर काढतो त्याचे प्रमाण हे निर्धारित आहे त्यानुसार ही परीक्षा केली जाते
ड)वैगिकी- यात रुग्णास वमन  वेळी किती वेग येतात म्हणजे किती उलट्या होतात त्यावर निर्धारिता असते
अश्या ४ प्रमुख परीक्षा वमन योग्य झाले की नाही ठरवतात.

९.वमन कर्मानंतर काही त्रास होतो का ?
– वमन जर योग्य पद्धतीने झाले असेल तर काहीही त्रास होत नाही

१०.वमन काळात काही पथ्य असतात का?
– सदर काळात व्यायाम बंद ठेवावा, नाश्ता करू नये…डॉकटरानी सांगितलेल्या वेळेतच जेवण करावे,त्यांनी ठरवून दिलेल्या भाज्या खाव्यात,भूक लागेल तेव्हाचा खावे, दिवसा झोपू नये, रोज उकळून कोमट केलेले पाणी प्यावे,टी.व्ही-ऊन-वारा-मोबाईल-वातानुकुलित साधाने यापासून दूर राहावे,थंडी पासून रक्षण करण्याकारिता स्वेटर,हातमोजे ,पायामोजे,कानटोपी,कानात कापसाचे बोळे यापासून रक्षण करावे,आंघोळीचे पाणी गरम असावे,दररोज पोट साफ राहिल याची काळजी घ्यावी.तसेच वमन पूर्ण झाल्यांतर वैद्यांनी सांगितलेला संसर्जन क्रम पाळावा.

१०.संसर्जन क्रम म्हणजे काय?
– वमन काळात पचन संस्थेतील स्त्राव पाझरणे बंद होते,पचन क्रिया थोडी मंदावते ती पुन्हा सुरळीत व व्यवस्थित करण्याकारिता लघु द्रव आहाराकडून गुरु घन आहाराकडे जाण्याचा क्रम म्हणजे संसर्जन क्रम .यात पेया,विलेपी,यवागू मांसरस याचा क्रमाणे वापर करण्यास सां गीतलें आहे व नियमित जेवणावर येण्याचे सूचित केले आहे.

११.वमन  केल्यानंतर धूमपांन का केले जाते ?
– धूमपान म्हणजे औषधी वनस्पतिचा धूर घेणे यात नाकाने धूर ओढून तोंडाने सोडावा व तोंडाने घेऊन तोंडाने सोडावा…नाकाने सोडू नये याने नजरेस त्रासा होतो.धूमपानाने उरलेला कफाचे शमन होवून उरलेला स्रोतसातील कफ देखील बाहेर पडतो.

१२.वमन प्रयोग घरी अजिबात करू नये..धोकादायक ठरु  शकतो
१३.वमन कर्मास साधारणा १५ दिवसां चा कालावधी लागतो.पण रुग्णास साधारणा २ दिवस सुट्टी च काढावी लागते.
याव्यतिरिक्त काही अडचणी असल्यास फोन वर जवळच्या डॉक्टराना जरूर विचारावे

डॉ.राहुल रमेश चौधरी
एम्.डी.(आयु.),मुंबई
एम.ए.(संस्कृत),पुणे पीएच्.डी.स्कॉलर
सहयोगी प्राध्यापक
श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यलय व रुग्णालय,नाशिक
मोबाईल-९०९६११५९३०

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.