

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष कृष्ण द्वितीया.,हेमंत ऋतू.,विश्वावसुनाम संवत्सर,शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – पुष्य / (दुपारी १.२५ नंतर) आश्लेषाचंद्र राशी – कर्क
योग – विषकुंभ योग
रवी ष चंद्र (षडाष्टक संबंध)
५ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर चंद्र आणि गुरू या ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. तुम्ही संवेदनशील, करुणामय आणि कुटुंबवत्सल स्वभावाचे असता. जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असते.तुमची स्मरणशक्ती उत्तम असून अनुभवातून शिकण्याची वृत्ती असते. इतरांना मानसिक आधार देणे, मार्गदर्शन करणे आणि संरक्षण देणे तुम्हाला आवडते.कधी कधी मनात चढ-उतार जाणवतात, मात्र संयम आणि समजूतदारपणामुळे तुम्ही परिस्थिती हाताळता. आर्थिक बाबतीत सावध पण दूरदृष्टीने विचार करणारे असता.सेवा, शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय किंवा सल्लागार क्षेत्रात तुम्हाला यश मिळते.
व्यवसाय : शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय सेवा, बँकिंग, समाजसेवा, सल्लागार.
शुभ दिवस : सोमवार, गुरुवार
शुभ रंग : पांढरा, क्रीम, फिकट निळा
शुभ रत्ने : मोती, पुष्कराज
(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग अवश्य करा)
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)आज कामाचा ताण वाढेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना संयम ठेवा. संध्याकाळनंतर मन हलके होईल.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)मन अस्थिर राहू शकते. बोलताना शब्द जपून वापरा. अनावश्यक चर्चा टाळाव्यात.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) आज चंद्र तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास वाढेल. घरगुती सुख समाधान लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) खर्च वाढण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) मित्रमंडळींकडून सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नियोजनबद्ध कामे यशस्वी ठरतील.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. मात्र अहंकार टाळा.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) संमिश्र दिवस आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)कामानिमित्त धावपळ होईल. कष्टाचे फळ मिळेल, मात्र थोडा उशीर संभवतो.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक खर्च संभवतो. मित्रांशी वाद टाळा.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)मन प्रसन्न राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सर्जनशील कामात यश मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य सोमवार, ५ जानेवारी २०… […]