
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक शुक्ल त्रयोदशी.
विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
चंद्र – मीन राशीत.
नक्षत्र – उत्तराभाद्रपदा आणि रेवती.
आज शुभ दिवस आहे. *सोम प्रदोष* आवळीच्या झाडाखाली विष्णुपूजन. वैकुंठ चतुर्दशी उपवास.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.००.(Marathi Rashi Bhavishya)
मेष: चंद्र व्यय स्थानी असल्याने उत्साह आणि कार्यक्षमता कमी होईल. मात्र नवीन कामाची सुरुवात शुभ. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.
वृषभ: आर्थिक बाबतीत स्थैर्य. पण खर्च वाढण्याची शक्यता. मानसिक शांतता राखा. ध्यान किंवा प्रवास उपयुक्त ठरेल.
मिथुन: मित्र व सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. नवीन योजना तयार होतील. सामाजिक क्षेत्रात नाव वाढेल.
कर्क: वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कार्यसिद्धीचा दिवस. अधिकार वाढण्याची शक्यता. महत्त्वाचे निर्णय घेतल्यास यश लाभेल.
सिंह: प्रवास आणि नवीन ओळखींसाठी योग्य दिवस. नोकरी व शिक्षणात प्रगती. भाग्य तुमच्या बाजूने आहे.
कन्या: आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. भावनिक निर्णय टाळा. दुपारनंतर मनात आनंद निर्माण होईल.
तूळ: भागीदारीतून लाभ. दांपत्य जीवनात सुसंवाद वाढेल. आर्थिक दृष्ट्या दिवस शुभ. नवी ओळख उपयोगी ठरेल.
वृश्चिक: कार्यक्षेत्रात परिश्रमाचे फळ मिळेल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. सहकाऱ्यांशी संवाद वाढवा.
धनु: प्रेमसंबंधात आनंददायक बदल. विद्यार्थ्यांना यशाचे संकेत. मनोरंजन व छंदविकासासाठी योग्य दिवस.
मकर: कौटुंबिक विषयांवर लक्ष केंद्रित करा. घरात शुभ कार्याचे योग. मातृसंबंध दृढ होतील. आर्थिक लाभाची शक्यता.
कुंभ: आज प्रवास योग उत्तम. लघु प्रयत्नांतून मोठं यश मिळेल. आत्मविश्वास वाढलेला राहील.
मीन: आर्थिक व्यवहारात दक्षता घ्या. आत्मचिंतनाचा दिवस. सकाळी थोडा अस्थिर काळ, पण दुपारनंतर यश मिळेल.
आजचा शुभ रंग: लाल
“ॐ श्रीं लक्ष्म्यै नमः”
विशेष टीप: चंद्र मीन राशीत असल्याने नवीन उपक्रम, करिअरमधील सुरुवाती, तसेच ऊर्जा आवश्यक असलेल्या कार्यांसाठी अत्यंत शुभ काळ.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



