
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया. चंद्र — मिथुन राशीत.
आर्द्रा नक्षत्र.
योग — बुध त्रिकोण गुरू (अत्यंत शुभ ज्ञान–वाणी–कार्यक्षेत्रयोग) दक्षिणायन | सौर हेमंत ऋतू |
शके १९४७ | संवत २०८२.
राहूकाल — शनिवार : सकाळी ९:०० ते १०:३०
आजचा दिवस बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, शिकण्याची ऊर्जा आणि प्रगतीसाठी उत्तम आहे.
बुध–गुरू त्रिकोण हा अत्यंत सकारात्मक योग असून निर्णय क्षमता, नशीब आणि आर्थिक वाढ यांना चालना देतो.
चंद्र मिथुन राशीत असल्याने आज माहिती, व्यवहार, मीटिंग, प्रवास, नेटवर्किंग यांत यश.(Marathi Rashi Bhavishya)
मेष –आज कामात नवे अवसर. बुध–गुरू योगामुळे पैशांबाबत चांगला लाभ. प्रवास शुभ. दुपारी थोडे मन चंचल, पण दिवस समृद्ध.
वृषभ – आर्थिक लाभाची सुरुवात. घर–कुटुंबात शांतता. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल. संवादातून मोठा फायदा मिळू शकतो.
मिथुन -चंद्र तुमच्या राशीत असल्याने तेज, प्रभाव, निर्णयक्षमता वाढेल. नवीन कामांची सुरूवात शुभ. आरोग्य सुधारेल. मोठा लाभयोग.
कर्क –गोपनीय कामे, संशोधन, आध्यात्मिक क्रिया यांत यश. खर्च वाढेल पण योग्य कारणासाठी. दुपारी अचानक चांगली बातमी मिळेल.
सिंह -मित्र, नेटवर्क किंवा समूहातून लाभ. करिअरमध्ये नवी दिशा. विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम योग. प्रवास यशस्वी.
कन्या -करिअरमध्ये प्रगती. वरिष्ठांचे समर्थन. आर्थिक स्थैर्य वाढेल. परदेशसंबंधी कामे गतिमान. आज तुमची वाणी प्रभावशाली.
तुळ –भाग्य तुमच्या बाजूने. शिक्षण, प्रवास, कोर्ट–कचेरीसाठी शुभ. महत्वाचा निर्णय घेतल्यास फायदा. दुपारी सौम्य ताण येऊ शकतो.
वृश्चिक -अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. पार्टनरशिपमध्ये सुधारणा. आरोग्याबाबत काळजी घ्या. आज गुप्त लाभाचा योग.
धनु –नाते संबंधात सुधारणा. विवाहयोग, करार, व्यवहार यासाठी उत्तम वेळ. आज एखादी महत्त्वाची भेट लाभदायक ठरेल.
मकर –दैनंदिन कामांमध्ये मोठी प्रगती. ऑफिसचे अडथळे दूर होतील. आरोग्य ठीक. आर्थिक नियोजन यशस्वी.
कुंभ -सर्जनशील काम, लेखन, मीडिया, शिक्षण यांसाठी सर्वोत्तम दिवस. प्रेमसंबंधात आनंद. मुलांच्या बाबतीत शुभ बातमी.
मीन –घर–कुटुंबात समाधान. मालमत्ता, नूतनीकरण, वाहन खरेदीसाठी चांगला दिवस. आर्थिक वाढ सुरू. दुपारी भावनिक निर्णय टाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)





[…] […]