

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष कृष्ण प्रतिपदा,हेमंत ऋतू,विश्वावसुनाम संवत्सर,शके १९४७, संवत २०८२
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – पुनर्वसू / (दुपारी ३.११ नंतर) पुष्य
चंद्र राशी – मिथुन / (सकाळी ९.४३ नंतर) कर्क
योग – वैधरुती योग
चंद्र त्रिकोण शनी, चंद्र लाभ हर्षल, चंद्र त्रिकोण नेपच्यून
४ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-(Marathi Rashi Bhavishya
तुमच्यावर चंद्र, बुध व शनी या ग्रहांचा प्रभाव दिसून येतो. तुम्ही संवेदनशील, विचारशील आणि अभ्यासू स्वभावाचे असता. तुमचे मन सतत काहीतरी नवीन शिकण्याकडे झुकलेले असते.तुम्हाला स्थैर्य, शिस्त आणि नियोजन यांची आवड असते. एकदा घेतलेला निर्णय पूर्णत्वास नेण्याची क्षमता तुमच्यात असते. कधी कधी भावनिक अस्वस्थता जाणवते, मात्र त्यावर तुम्ही बुद्धीच्या जोरावर मात करता.तुम्ही विश्वासू, जबाबदार आणि कुटुंबाभिमुख असता. इतरांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांना मानसिक आधार देणे हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत.व्यवसाय, नोकरी किंवा संशोधन क्षेत्रात तुम्हाला हळूहळू पण निश्चित प्रगती मिळते. उतावळेपणा टाळला तर जीवनात मोठे यश मिळू शकते.
व्यवसाय : शिक्षण, प्रशासन, लेखन, संशोधन, बँकिंग, वैद्यकीय सेवा, समाजसेवा.
शुभ दिवस : सोमवार, बुधवार, गुरुवार
शुभ रंग : पांढरा, फिकट निळा, करडा
शुभ रत्ने : मोती, पन्ना
(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग अवश्य करा)
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)–आज खर्च वाढू शकतो. मन थोडे अस्वस्थ राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहन जपून चालवा.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)–कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मात्र निर्णय घेताना घाई टाळा.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)–चंद्र तुमच्याच राशीत असल्याने भावनिक चढउतार जाणवतील. बोलताना संयम ठेवा. कामे पुढे ढकलणे टाळा.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)–सकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. मन स्थिर होईल. कुटुंबासाठी वेळ द्याल. मानसिक शांतता मिळेल.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)–आज वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाचे निर्णय टाळावेत. वादविवादापासून दूर राहा.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)–कामाच्या ठिकाणी दबाव वाढेल. मात्र शिस्त आणि संयम ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)–मनात द्विधा अवस्था राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आवडत्या व्यक्तीशी मतभेद संभवतात.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)–संमिश्र ग्रहमान आहे. आज शांत राहणे हिताचे ठरेल. गुप्त गोष्टी उघड करू नका.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)–आज प्रवास टाळलेला बरा. कामात अडथळे येऊ शकतात. संयम ठेवल्यास नुकसान टळेल.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)–चंद्राचा शनीशी त्रिकोण असल्याने कष्टाचे फळ उशिरा मिळेल. आज अपेक्षा मर्यादित ठेवा.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)–आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अचानक खर्च संभवतो. मित्रांशी वाद टाळा.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)–धार्मिक किंवा आध्यात्मिक विचार वाढतील. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान-प्रार्थना उपयुक्त ठरेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य रविवार, ४ जानेवारी २०… […]