नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री मंडळाचा आज विस्तार करण्यात आला असून आज ४३ चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.महाराष्ट्रातील ४ खासदारांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्राला एक कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपद मिळाले आहे. कॅबिनेट मध्ये नारायण राणे यांना संधी मिळाली तर दिंडोरी मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या सह कपिल पाटील ,डॉ.भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर आता नवं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. तर डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतल्यानंतर आरोग्य खात्याचा पदभार आता मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आलाय. विद्यमान केंद्रीय मंत्रि स्मृती इराणी यांच्याकडे फक्त महिला व बालविकास खात्याची जबाबदारी राहणार आहे.अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे खाते देण्यात आले आहे. धर्मेद्र प्रधान यांच्या कडे शिक्षण खाते देण्यात आले आहे.नारायण राणे यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योग हे खाते मिळाले आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री यांच्यासह अजून दोन खाते मिळाले आहे.
डॉ. भरती पवार यांच्याकडे कुटुंब कल्याण राज्य मंत्री यांची जवाबदारी देण्यात आली आहे. डॉ. भागवत कराड यांच्या कडे अर्थराज्यमंत्री मंत्र्याची जवाबदारी देण्यात आली आहे .कपिल यांच्याकडे पंचायतराज राज्यमंत्री याची जवादारी देण्यात आली आहे.
हवाई वाहतूक मंत्री जोतिदरादित्य सिंधीया यांच्या कडे देण्यात आले आहे. हरदीप पुरी पेट्रोलियम मंत्री असतील .
केंद्रीय मंत्रिमंडळाची यादी
New bottle, old wine .. Simply by reshuffling cards, one cannot enhance efficiency and productivity.
.