मुंबई, दि. ९ जून २०२५ – Mumbai local train accident मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघात घडला. दोन लोकल ट्रेन समोरासमोर जात असताना प्रचंड गर्दीमुळे प्रवासी लोकलच्या दरवाजावरून खाली पडले. या घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेचे ठिकाण आणि वेळ:
अपघात मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान सकाळी सुमारे ९.३० वाजता घडला.
दोन विरुद्ध दिशेने धावणाऱ्या लोकलमधील प्रवासी दरवाज्याला लटकलेले होते.
या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्यामुळे एकूण आठ प्रवासी ट्रॅकवर पडले.
मृत्यूमुखी पडलेले प्रवासी:
प्रवाशांमध्ये एक GRP जवानाचा समावेश आहे. अपघातानंतर काही वेळातच अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचल्या आणि सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींची माहिती:(Mumbai local train accident)
फूटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांचा धक्का लागला.
हे सर्व प्रवासी कसारा–सीएसटी मार्गावरील लोकलने प्रवास करत होते.
घटना अतिशय वेगात घडल्याने बचाव कार्यालाही वेळ लागला.
तक्रारी, पूर्वसूचना आणि रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण:
तीन महिन्यांपूर्वी प्रवाशांनी याच वळणावर अपघात होण्याची शक्यता वर्तवली होती.
त्यापैकी एका प्रवाशाचे दोन्ही पाय याच अपघातात गेले आहेत
रेल्वेच्या सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी सांगितले की, ही घटना फक्त लोकल ट्रेनमधूनच घडली असून पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नाही.
#WATCH | Mumbai | On the Mumbra railway mishap, Maharashtra Deputy CM Eknath Shinde says “We will prioritise the treatment of the injured. Compensation will be given from the Railways and the government to the people who have lost their lives.” pic.twitter.com/ZU95G8vTZt
— ANI (@ANI) June 9, 2025
रेल्वेची पुढील पावले:
ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या नव्या लोकल ट्रेन लवकरच रूळांवर येणार.
जुन्या लोकलमध्येही रेट्रोफिटिंगद्वारे दरवाजे बंद होणारी यंत्रणा बसवण्याचा विचार.
कल्याण–कसारा आणि कल्याण–कर्जत मार्गांवर तिसरी व चौथी लाईन, तसेच दादर–कुर्ला–सीएसटीसाठी पाचवी व सहावी लाईन तयार करण्यात येणार.
Mumbai: 8 passengers travelling towards CSMT fall from excessive crowded train at Mumbra Station
Read @ANI Story | https://t.co/JYDVpsVJDr#Mumbai #CSMT #MumbraRailwayStation pic.twitter.com/xQVve1n4bZ
— ANI Digital (@ani_digital) June 9, 2025