नाशिक सिटीबस सेवेच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला ! या तारखेला होणार उद्घाटन

0

नाशिक-गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील बहुचर्चित सिटीबस सेवेच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या ८ जुलैला लोकार्पण सोहळा करून नाशिककर नागरिकांच्या सेवेसाठी रुजू होत असल्याचे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहराचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेली शहर बस वाहतूक ८ जुलैला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस,नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ  व भाजपाचे प्रदेश  चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन होऊन नाशिक नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होत असल्याचे माननीय महापौर यांनी स्पष्ट केले आहे याकरिता महापौर यांनी मुंबई येथे विरोधी पक्ष नेते यांच्या निवासस्थानी जाऊन बस सेवेच्या उद्घाटनाचे त्यांना निमंत्रण दिले आहे.

या उदघाटन समारंभास  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल उपस्थित राहणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना निमंत्रण देण्यासाठी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या समवेत उपमहापौर श्रीमती भिकुबाई बागुल स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  बाळासाहेब सानप आमदार  राहुल ढिकले शहराध्यक्ष गिरीश पालवे भाजपाचे ज्येष्ठ नेते  लक्ष्मण सावजी  विजय साने हे उपस्थित होते

Nashik Citybus Service Inauguration will take place on this date

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!