९ मार्चला नाशिकमध्ये रंगणार एम आर एफ मोग्रीप सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार 

नाशिक मध्ये प्रथमच प्रकाश झोतात होणार स्पर्धा 

0

नाशिक,दि,५ मार्च २०२४ –एम आर एफ मोग्रीप,एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस  स्पर्धा ९ मार्च  रोजी नाशिक येथे संपन्न होत आहे .गॉडस्पीड आयोजित एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून २०२४ सालच्या स्पर्धेतील हि पहिली फेरी आहे .या स्पर्धेत ऑस्ट्रिया चे थॉमस व स्वित्झलँड येथील व्हिवियान हे दोन विदेशी वाहन चालक आपल्या विदेशी बनावटीच्या वाहनाद्वारे फ्रीस्टाईल मोटोक्रॉस चे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.

भारत सरकार व आंतरराष्ट्रीय ऑलीम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया एफ एम एस सी आय या मोटरस्पोर्ट्स महासंघाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून या स्पर्धेचे आयोजन केले जाते .

सात वर्ष राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळवलेल्या शाम कोठारी यांच्या अधिपत्याखालील गॉड्स्पीड रेसिंग या संस्थेकडे या स्पर्धेचे सर्व अधिकार असून मागील पंचवीस वर्षांपासून गॉडस्पीड रेसिंग या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहे .

नाशिक मधील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा सुरज कुटे ,साहिल न्याहारकर ,शमीम खान ,अंकित गज्जर ,गणेश लोखंडे व सहकारी यांनी सांभाळली असून ट्रॅक बनवण्याचे अत्यंत महत्वाचे व जिकरीचे कामही त्यांनी हाताळले आहे .ऑटोथोन व गॉडस्पीड  याच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे .

सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकल साठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात .उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो .दिवसोंदिवस या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे .प्रायोजक व प्रसिद्धी माध्यमांकडून मिळत असलेल्या भरघोस सहकार्यामुळे सर्वच प्रकारच्या मोटरस्पोर्ट्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे .

आपले कसब अजमावण्यासाठी स्पर्धकही या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात . नाशिकमध्ये होत असलेल्या या फेरीसाठी भारतातून विविध नऊ गटांमध्ये विभागून तब्बल १५० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे .

उत्तम संयोजक अनेक राष्ट्रीय विजेते नाशिकमध्ये तयार झालेले असल्याने मोटारस्पोर्ट्स विश्वात नाशिकचे एक वेगळेच स्थान आहे .नाशिकमधील प्रेक्षकांना देखिल स्पर्धाप्रकारातील बारकावे माहित असल्याने मैदानावर एक वेगळेच उत्साहपूर्ण वातावरण असते .

या स्पर्धेसाठी एफएमएससीआय चे मुख्य प्रबंधक म्हणून रवी श्यामदासानी हे काम बघणार आहेत तर सत्यजित नायकव श्रीरंग मत्से हे अधिकारी विशेष निमंत्रित असणार आहेत .  वाहन तपासणीस म्हणून अंकित गज्जर तर तांत्रिक समिती प्रमुख म्हणून रविंद्र वाघचौरे हे काम बघणार आहेत .

शाम कोठारी यांच्या मार्गदर्शनानुसार सुरज कुटे  व त्यांच्या सहकारी गटाने बनवलेल्या या मार्गावर १५ जम्पस , १ टेबलटॉप , व १ कट टेबलटॉप असणार आहे . तुलनात्मक रित्या बराच वेगवान ट्रॅक बनविलेला असल्याने स्पर्धकांचे कसाब पणाला लागणार असून प्रेक्षकांना मात्र येथे नेत्रदीपक स्पर्धा बघायला मिळेल .

एस एक्स १ या विदेशी बनावटीच्या मोटारसायकल साठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळणार असून टीव्हीएस रेसिंग टीम , हिरो टीम च्या स्पर्धकांचा सहभाग या गटातील रंगात वाढवणार आहे .या स्पर्धेमध्ये ऋग्वेद बारगुजे ,श्लोक घोरपडे , इशान शानबाग  याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे . या स्पर्धेसाठी एम आर एफ टायर लि. ,टी व्ही एस मोटार कंपनी ,सर्वो ऑइल , अक्सर हेल्मेट ,एम एक्स स्टोअर आणि मोस्टर एनर्जी हे प्रायोजक लाभलेले आहेत .

या स्पर्धेचे आयोजन ठक्कर डोम ,सिटी सेंटर मॉल जवळ ,नाशिक येथे होणार असून शुक्रवार ८ मार्च  २०२३ रोजी दुपारी वाहन तपासणी होणार असून संध्याकाळी ५ वाजल्या पासून सराव होणार आहे . तर मुख्य स्पर्धेला शनिवारी ९ मार्च  रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रारंभ होणार आहे .तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या पर्वणीच लाभ घ्यावा असे आवाहन गोडस्पीड रेसिंगचे  शाम कोठारी व सुरज कुटे यांनी केले आहे .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.