नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासात प्रथमच होणार उडिसीनृत्य मंच प्रवेश
नृत्यसाधीका व गुरू डॉ.संगीता पेठकर यांच्या दोन शिष्या १७ मार्चला करणार मंच प्रवेश
नाशिक,दि,१३ मार्च २०२४ –नासिकच्या सांस्कृतिक इतिहासात जोडला जाणार असून नासिक शहरातील दोन नृत्यसाधीका व गुरू डॉ. संगीता पेठकर ह्यांच्या शिष्या नासिक शहरात प्रथमच उडिसी नृत्य मंच प्रवेशाचा अध्याय जोडत आहेत. नाशिक मध्ये हा आनंद सोहळा प्रथमच घडत आहे. गुरु पद्मभूषण केलूचरण मोहापात्रांचे मार्गदर्शन प्राप्त डॉ. संगीता पेठकर यांच्या दोन शिष्या किरण खाडे व समिक्षा उपासनी १७ मार्च २०२४ रोजी संध्या ६ वा.नासिक मध्ये मंचप्रवेश सादर करत आहेत.उडिसी मंच प्रवेशासाठी गुरु केलूचरण महापात्रांचे सुपुत्र गुरू रतिकांत महापात्रा तसेच गुरुजींच्याच् वरिष्ठ शिष्या श्रीमती दक्षा मश्रूवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. नासिककरांसाठी गुरुदक्षिणा नाट्य गृहात कॉलेज रोड येथे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला रहाणार आहे.
नासिक मध्ये अनेक वर्षांच्या अथक साधने नंतर नृत्यसायक ह्या नृत्याचे प्रशिक्षण घेवून त्यांच्या प्रथम रंगमंच प्रवेशासाठी तयार आहेत. हा रंगमंच प्रवेश म्हणजे अनेक वर्षांच्या साधनेनंतर जेव्हा मृत्यसाधक प्रविण होतो आणि संपूर्ण उडिसी नृत्याचे पद एका नंतर एक समर्थपणे प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो तेंव्हा केला जातो. ३ तासांच्या ह्या नृत्य सादरीकरणात गुरु पूजन व गुरू विषयी कृतज्ञता मंचावर प्रदर्शित केली जाते .उडिसी नृत्यासाठी लागणारे वाद्यवृंदही त्यांना साथ देण्यासाठी सज्ज होतात. मर्दल, सितार,. बासरी, गायक, मंजीरा ध्या वाद्य संगीताच्या संगतीनें ‘ उडिसीचे सादरीकरण फुलत जाते
नासिककरांसाठी .हा आनंद सोहळा प्रथमच घडत आहे .अत्यंत मन मोहक आकर्षक व मूर्तिमंत हालचालींनी परिपूर्ण ह्या नृत्याची मोहीनी संपूर्ण जगाला आहे. ह्याच जगप्रसिद्ध नृत्याच्या नासिक शहरातील दोन नृत्यसाधीका व गुरू डॉ. संगीता पेठकर ह्यांच्या शिष्या नासिक शहरात प्रथमच उडिसी नृत्य मंचप्रवेशाचा अध्याय जोडत आहेत शहरात २००२ मध्ये नृत्यसाधना ॲकॅडमीची स्थापना झाली. डॉ संगीता पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रथमच उडिसी व भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. अशाप्रकारे उडिसी ह्या शास्त्रीय नृत्याची ओळख डॉ संगीता पेठकर ह्यांच्या द्वारे शहराला झाली .जागृती ” नावाचा उपक्रम राबवत Lec-Dem द्वारे शाळा-कॉलेजेस, सामाजिक संस्था मध्ये जावून त्यांनी या नृत्या चा प्रचार व प्रसार सुरु केला. २००२ पासून सातत्याने कार्य करत त्यांनी कार्यशाला, प्रगति उत्सव ह्या सारख्या कार्यक्रमांद्वारे उडिसी नृत्याला जनमानसात रुजवले.
नासिकच्या कला संस्कृती व साहित्य संस्कृतीत नविन अध्याय जोडला जात असून ह्या उडिसी मंच प्रवेशासाठी भुवनेश्वर वरून गुरु केलूचरण महापात्रांचे सुपुत्र गुरू रतिकांत महापात्रा उपस्थित रहाणार असून गुरुजींच्याच् वरिष्ठ शिष्या श्रीमती दक्षा मश्रूवाला मुंबईहून येणार आहेत. ओरिसा राज्यातील प्रसिद्ध कोणार्क मंदीरात कोरलेल्या, भगवान जगन्नाथाला समर्पित असलेल्या ध्या जगप्रसिद्र् नृत्याचा आनंद घेण्यासाठी नासिककरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.