नाशिक,दि. १७ सप्टेंबर २०२३ –राज्याचे माजीमंत्री बनराव घोलप यांनी काही दिवसांपूर्वी उपनेते पदाचा दिलेला राजीनामा दिला.हा राजीनामा शिवसेना पक्ष श्रेष्ठींनी स्वीकारला नसला तरी ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना वेट अँड वॉच ठेवले आहे.त्यानंतर उदभवलेली राजकीय परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करत आज सकाळी शिवाजी पार्क,मुंबई येथील शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळी चर्मकार समाजातील घोलपांचे नतमस्तक झालेले समर्थक यामुळे सर्वच राजकीय वर्तुळात झालेली उलथापालथ आणि त्यानंतर आज अचानक देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते योगेश घोलप यांनी आज मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वे शरद पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मधे सदिच्छा भेट घेतल्याने देवळालीत राजकीय भूकंप होतो की काय असा उलट सुलट चर्चेला उधाण आले
शिवसेनेत चाळीस वर्ष ज्यांनी खडतर प्रवासात घातली आणि शिवसेनेचे पाळेमुळे तळागाळातील नागरिकां पर्यत पोहचवले असे राज्याचे माजीमंत्री बनराव घोलप यांनी काही दिवसांपूर्वी उपनेते पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर मातोश्रीवरून अद्यापही निरोप अथवा फोन आला नसल्यामुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्वतः घोलप सुद्धा याबाबत नाराज आहे मात्र घोलप हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे समजते.
त्याचप्रमाणे घोलप यांच्या समर्थनार्थ आज रविवार दिनांक १७ रोजी छत्रपती शिवाजी पार्क मुंबई दादर येथे चर्मकार समाजाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले.तर दुसरीकडे बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.दरम्यान जनस्थानने या संदर्भात योगेश घोलप यांच्याशी संपर्क साधला असता शरद पवार हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असून ठाकरे गट महाविकास आघाडी गटाचा एक घटक आहे.त्यामुळे आपण त्यांचे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले असे योगेश घोलप यांनी सांगितले.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी दिनेश धात्रक उमेश खातळे मनोज पालखेडे शिवसेना ठाकरे गटाचे नितीन चिडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.