नाशिक– निफाड तालुक्यातील चांदोरी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.नाशिक ग्रामीण पोलीसांची सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बनावट देशी दारू बनविण्या या कारखान्यावर मोठी कारवाई केली आहे. सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरित्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असलेबाबतची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस जणांच्या पथकासह अवैध दारू कारखान्यावर सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास धाड टाकत कारवाई केली आणि सुमारे एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे नाशिक जिल्ह्यातील हि सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स आहे. यावर अवैध देशी दारू तयार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने ११ ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. यावेळी संजय मल्हारी दाते वय वर्ष ४७ राहणार गोंदेगाव तालुका निफाड हा तिथे सापडला.
येथून बनावट देशी दारुचे अंदाजे १५०० ते २००० बॉक्स, अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, २० हजार लिटर स्पिरिट, दोनशे लीटर चे ९० ते १०० बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे पाच हजार ते १० हजार, देशी दारु बनवण्याचे साहित्य ५ पाण्याच्या टाक्या, व ०१ ट्रक असा एकुण अंदाजे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाआहे.पोलीस अधीक्षक यांनी ताफ्यासह धाड मारली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, संजय पाटील, प्रभाकर शिरोळे, मुनिर पवार, ज्ञानदेव सय्यद, शामराव गडाख, बंडू ठाकरे, नितीन मंडलिक, हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, भगवंत निकम, गणेश वराडे, नंदू काळे, विश्वनाथ काकड, सागर काकड, सतीश काकड, सतीश जगताप, मंगेश गोसावी, सुशांत मरकड, रवींद्र टरले, प्रीतम लोखंडे, किरण काकड, भूषण उन्हावणे, नौशाद शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पोलिसांच्या या कारवाईने अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.