नाशिक – निफाड तालुक्यातील चांदोरी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.नाशिक ग्रामीण पोलीसांची सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बनावट देशी दारू बनविण्या या कारखान्यावर मोठी कारवाई केली आहे. सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरित्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असलेबाबतची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस जणांच्या पथकासह अवैध दारू कारखान्यावर सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास धाड टाकत कारवाई केली आणि सुमारे एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे नाशिक जिल्ह्यातील हि सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते आहे.
Prev Post