नाशिक,दि,१६ एप्रिल २०२४ – वाढत्या उकाड्यामुळे नाशिककर हैराण झाल्याचे चित्र काही दिवसापासून दिसते आहे.काल सोमवार (दि. १५ एप्रिल) नाशिक(Nashik Temperature) मध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यातच तापमानात कमालीची वाढ झाली आहे.नाशिकमध्ये ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.वाढत्या उकाड्यामुळे नाशिककर हैराण झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद आज करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये सोमवारी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.रविवारी ३८.४,तर जळगावचे तापमान 39.0 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.येत्या आठवड्यात तापमान अधिक वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
दीर्घकाळ उन्हात राहू नये
या कालावधीमध्ये दीर्घकाळ उन्हात राहू नये, असे प्रादेशिक हवामान विभागाने सुचवले आहे.तसेच पाणी पिणे, सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी, छत्री किंवा अन्य कपडा घेणेही अपेक्षित आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास जाणवू शकतो, या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारपासून नाशिकमध्ये तापमानाचा पारा तापायला सुरुवात होणार आहे. सोमवारी १५ एप्रिल ते बुधवार १७ एप्रिल या कालावधीत कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढू शकतो. तसेच या कालावधीत उष्णता निर्देशांक ४० अंश ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.