मुंबई – “तारक मेहता का उल्टा चश्मा” मालिकेतील लोकप्रिय पात्र साकरणाऱ्या नट्टू काकांचे निधन झाले आहे.ते वयाच्या ७७ वर्षाचे होते.अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्याची दोन ऑपरेशन्सही झाली होती. पण त्यांना या आजारातून बाहेर यश आले नाही. आज संध्याकाळी ५:३० वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला. घनश्याम नायक उर्फ नट्टू काका जेठालालची भूमिका करणाऱ्या दिलीप जोशीच्या खूप जवळचे होते.त्यांचे मुंबईतल्या मालाडमधील एका रुग्णालयात निधन झाले.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही लोकप्रिय मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना नेहमीच जवळचे वाटत असते. भिडे, जेठालाल, दयाबेन, नट्टू काका, अब्लूल, बावरी असे अनेक छोटे मोठे पात्र प्रेक्षकांना कायम आवडत राहिल.