ब्रेक द चेन अंतर्गत राज्यशासनाची नवीन नियमावली जाहीर : २२ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल 

0

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम

मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग घटल्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत राज्यशासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या ११ या जिल्ह्यातील निर्बंध मात्र कायम राहणार आहेत  तसेच मुंबई उपनगरासह ठाणे जिल्हा वगळून इतर २२ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबई आणि ठाण्याबाबत चा निर्णय आपत्कालीन व्यवस्थापन घेणार असल्याचे सांगण्यात आले.राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत.

निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार  सकाळी ७ ते रात्री ८ वाजे पर्यंत  सुरु राहणार आहे.शनिवारी मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील

सार्वजनिक उद्याने, जीम, मैदाने सुरू राहतील सर्व सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील जिम्नॅशिअम, योगा, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा हे सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत तर शनिवारी दुपारी ३ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू रविवारी पूर्णपणे पूर्णपणे बंद राहतील .केवळ वैद्यकीय सेवा व आपत्कालीन सेवा सुरू राहतील. सर्व धार्मिक स्थळे बंदच राहतील सिनेमा, मल्टीप्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

ज्या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते पुढीलप्रमाणे 

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्णसंख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत निश्चित ठरवतील.

उर्वरित जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये खालीलप्रमाणे सूट राहील

सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील.

रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.

सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार.

प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सूचना सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सुट नाही.

राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंदच राहतील.

शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.

सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.

रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.

गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

असे आहेत आदेश

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.