स्टार प्रवाहवर १४ फेब्रुवारी पासून भेटीला येणार नवी मालिका ‘मुरांबा’

अनोख्या लव्हस्टोरीची प्रेक्षकांसाठी खास भेट

0

मुंबई – स्टार प्रवाह प्रेक्षकांची अभिरुची जपत मनोरंजन विश्वात नवनवे प्रयोग करत असते. दर्जेदार मालिका, उत्तम लिखाण, आपलीशी वाटणारी पात्र आणि जोडीला कसदार दिग्दर्शन यामुळेच आज स्टार प्रवाह वाहिनीने घराघरातच नाही तर प्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावलं आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर असणारी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी आता दुपारच्या वेळेतही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

प्रवाह दुपार या नव्या स्लॉट अंतर्गत लग्नाची बेडी आणि मुरांबा या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लग्नाची बेडी ३१ जानेवारीपासून तर मुरांबा १४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रेमाचा हा आंबट गोड मुरांबा कसा मुरणार याची गोष्ट ‘मुरांबा’मधून उलगडेल. सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय मुकादम असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

या भूमिकेविषयी सांगताना शशांक केतकर म्हणाला, ‘मी खूप उत्सुक आहे. जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय. मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुंबध त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. स्टार प्रवाह वाहिनीची मनापासून आभार त्यांनी प्रवाह दुपारच्या माध्यमातून आता दुपारीही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा प्रवाह सुरु केला आहे.

१४ फेब्रुवारीला मालिका सुरु होतेय त्यामुळे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी मुरांबा ही मालिका छान गिफ्ट असेल.  नवी मालिका मुरांबा दुपारी १.३० वाजता स्टार प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.