कलाकारांच्या जोशपूर्ण परफॉर्मन्सने रंगणार नवीन वर्षाची पार्टी

'स्टार प्रवाह धुमधडाका २०२२’

0

मुंबई – ‘स्टार प्रवाह धुमधडाका २०२२’ या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. इथे तारे आहेत इथे सारे आहेत, इथे दोस्ती आहे इथे मस्ती आहे, इथे धमाल आहे आणि इथेच धुमधडाका आहे. धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार आहे. ‘स्टार प्रवाह धुमधडाका २०२२’या कार्यक्रमातून

सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचे कलाकार सज्ज आहेत. तुमच्या लाडक्या कलाकारांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरबसल्या सहकुटुंब अनुभवता येईल. स्टार प्रवाहच्या कलाकारांसोबतच श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, मानसी नाईक यांच्या दिलखेचक अदाही या कार्यक्रमातून पाहायला मिळतील.

आनंद शिंदेंची गाणी ऐकली की पाय आपसुकच थिरकायला लागतात. स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ हा कार्यक्रमही याला अपवाद ठरला नाही. आनंद शिंदेंच्या गाण्यावर स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार मनसोक्त नाचला. अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांच्या अफलातून जुगलबंदीने कार्यक्रमाला चार चांद लागले. खास बात म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला कोठारे यांनी पहिल्यांदाच एकत्र स्टेज शेअर करत एक अनोखा नृत्याविष्कार सादर केला. हटके परफॉर्मन्ससोबतच सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांच्या खुमासदार सुत्रसंचलनाने या कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.

स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ रविवार २ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.