नाशिक – सार्वजनिक वाचनालय, नाशिक व लोकहितवादी मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त ८ ऑगस्ट,२०२२ रोजी सकाळी ८ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा नाशिक शहरातील शाळांसाठीच मर्यादीत आहे. आपल्या शाळांनी संघातील कलाकारांच्या (वादक, मार्गदर्शक) यांच्या यादीसह सार्वजनिक वाचनालयात ४ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा. असे अवाहन दोन्ही संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या सहा.व्यवस्थापक सौ. योगिनी जोशी,(९३२५२५१३५५) सार्वजनिक वाचनालय, टिळकपथ, नाशिक यांच्याशी संपर्क करावा. अथवा https://forms.gle/gDsHWJQM9vq9eUix9 या लिंकवर नोंदणी करावी या स्पर्धेत सहभाही होणाऱ्या संघांनी देशभक्तीपर समूह गीतच सादर करावे लागेल.
गीत हिन्दी किंवा मराठी भाषेतून सादर करता येईल. चित्रपटातील देशभक्तीपर समुहगीतास परवानगी दिली जाणार नाही. स्पर्धकांनी त्यांना लागणारे साहित्य सोबत आणावे. कमीत कमी चार व जास्तीत जास्त दहा गायक स्पर्धकांचा एका संघात समावेश असेल. संघ मुलांचा, मुलींचा किंवा मुले-मुलींचा एकत्रितही चालू शकेल. संघाबरोबर वादक, साथीदारांची संख्या जास्तीत जास्त तीन असावी, परंतु गायकांना गाता गाता वाजवण्यास परवानगी असेल. रंगमंचावर येणे, संगीत साहित्य लावणे इ. पूर्वतयारीसाठी पाच मिनिटांपेक्षा जास्त कालावधी दिला जाणार नाही.
समूहगीतांसाठी मिळून किमान आठ व कमाल १० मिनीटांचा वेळ दिला जाईल. जास्तीत जास्त ३० सेकंद अधिकचा वेळ मान्य करण्यात येईल. त्यापेक्षा अधिक वेळ झाल्यास संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल. समुह गीताचे परीक्षण केवळ गायनाच्या गुणवत्तेच्या आधारेच केले जाईल. रंगभूषा, वेशभूषा तसेच संघातील व्यक्तींनी केलेल्या हावभावांच्या आधारे केले जाणार नाही. परीक्षणासाठी गीताची निवड, स्वररचनेचे नाविन्य, ताल, गती, सांघिक एकता व सादरीकरण हे निकष वापरले जातील.
एका शाळेतून एका संघाला भाग घेता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतीम असेल. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. विजेत्या तीन संघाना आकर्षक मोठे स्मृतीचिन्ह देण्यात येतील. प्रवेशासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालय व लोकहितवादी मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष नोंदणी देखील करता येईल
ज्यांना लिंक द्वारे प्रवेश घेणे शक्य नसेल अशांनी सार्वजनिक वाचनालयात कामाकाजाच्या वेळेत प्रत्यक्ष येऊन फॉर्म भरुन दिला तरीही चालणार आहे. यामध्ये शाळेचे नाव, शाळेचा पत्ता, मार्गदर्शक शिक्षकाचे नाव, मार्गदर्शक शिक्षकाचा मोबाईल नंबर, समुहगीताचे बोल, समुहगीताचा कालावधी, विद्यार्थ्यांची संख्या, वादकांची संख्या, विद्यार्थ्यांची यादी या बाबी असणे गरजेच्या आहेत.