पेटीएमची ‘टॅप टू पे’ सुविधा 

मोबाइल डेटाशिवाय रिटेल आऊटलेट्समध्ये व्हर्च्युअल कार्डसमधून पेमेंट करता येणार 

0

मुंबई – भारतातील ग्राहक व व्यापाऱ्यांसाठीची आघाडीची डिजिटल परिसंस्था पेटीएमने आज ‘टॅप टू पे’च्या लाँचची घोषणा केली. हे वैशिष्ट्य युजर्सना पीओएस मशिनवर त्यांचा फोन टॅप करत त्यांच्या पेटीएम नोंदणीकृत कार्डच्या माध्यमातून त्वरित पेमेण्ट्स करण्याची सुविधा देते. फोन लॉक असताना किंवा मोबाइल डेटा किंवा इंटरनेट कनेक्शन नसताना देखील ही सेवा कार्यरत राहते. पेटीएमची ‘टॅप टू पे’ सेवा पेटीएम ऑन-इन-वन पीओएस डिवाईसेस आणि इतर बँकांच्या पीओएस मशिन्सच्या माध्यमातून देय भरणा-या अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे.

नवीन टॅप टू पे सेवेसह पेटीएम आपल्या प्रबळ तंत्रज्ञानाचा वापर करत निवडलेल्या कार्डच्या १६-अंकी प्रायमरी अकाऊंट नंबरला (पीएएन) सुरक्षित व्यवहार कोड किंवा ‘डिजिटल आयडेण्टिफायर’मध्ये बदलते. हे डिजिटल आयडेण्टिफायर खात्री देते की, युजर्सच्या कार्डची माहिती युजरपुरतीच मर्यादित राहिल आणि कोणत्याही थर्ड पार्टी पेमेण्ट प्रोसेसरसोबत शेअर केली जाणार नाही.

युजर्स रिटेल आऊटलेटमध्ये गेल्यानंतर पीओएस डिवाईसवर टॅप करत देय भरू शकतात, ज्यासाठी व्यवहारादरम्यान कार्ड माहिती शेअर करण्याची गरज भासत नाही.या नवीन वैशिष्ट्यासह एनएफसी (निअर फिल्ड कम्युनिकेशन) सपोर्ट असलेले कार्ड मशिन्स असलेल्या सर्व रिटेल आऊटलेट्समध्ये पेमेण्ट्स करता येऊ शकतात.

पेटीएम अॅपवरील समर्पित डॅशबोर्डच्या माध्यमातून कार्डसचे व्यवस्थापन करता येऊ शकते. हे डॅशबोर्ड कार्डच्या व्यवहार हिस्ट्रीची माहिती देते आणि कोणत्याही क्षणी सुलभ पाय-यांमध्ये प्रायमरी टोकनाइज्ड कार्ड देखील बदलता येऊ शकते. तसेच हे डॅशबोर्ड युजर्सना आवश्यक असल्यास कार्ड बदलण्याची किंवा डि-टोकनाइज करण्याची सुविधा देखील देते.पेटीएम प्रवक्ता म्हणाले, “आर्थिक सेवांचे खरे डिजिटायझेशन डेटाच्या मर्यादांमुळे त्यासंदर्भात येणारे अडथळे दूर झाल्यास शक्य आहे. टॅप टू पेच्या सादरीकरणासह आम्ही युजर्सना मोबाइल डेटासोबत किंवा मोबाइल डेटाशिवाय डिजिटल व्यवहार करण्याची सुविधा देत आहोत.

या सेवेला पेटीएम ऑन-इन-वन पीओएसचे, तसेच बहुतांश प्रमुख बँका व कार्ड नेटवर्क्सचे पाठबळ आहे, ज्यामुळे युजर्सना व्यापक निवडी मिळतात.

“युजर्स सुलभपणे पेटीएम अॅपवरील ‘टॅप टू पे’ पर्यायाची निवड करू शकतात आणि पुढील पाय-यांचे पालन करत त्यांचे कार्डस् कार्यान्वित करू शकतात:

१. कार्ड लिस्‍टमधून पात्र सेव्ह केलेले कार्ड निवडा किंवा टॅप टू पे होम स्क्रीनवरील ‘अॅड न्‍यू कार्ड’वर क्लिक करा.

२. पुढील स्क्रीनवर आवश्यक कार्ड माहिती भरा.

३. टॅप टू पेसाठी जारीकर्त्यांच्या सेवा अटी स्‍वीकारा.

४. कार्डसह नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर (किंवा ईमेल आयडीवर) आलेला ओटीपी प्रविष्ट करा.

५. आता टॅप टू पे होम स्क्रीनच्या वरील बाजूस कार्यान्वित झालेले कार्ड दिसेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.