नवी दिल्ली – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक चे सर्व्हर डाऊन झाल्याने नेटकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे.
अनेक सोशल मीडिया साइट्स बंद पडल्या. व्हाटसऍप डाऊन असल्याचं अधिकृतरीत्या अद्याप सांगण्यात आलेलं नसलं तरी जगभरात मोठ्या प्रमाणावर या मोबाइल अॅपला तांत्रिक अडचणींनी सामोरे जावे लागत आहे.
सर्व्हर अचानकपणे बंद, कारण अद्याप अस्पष्ट
जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे मागील वीस मिनिटांपासून जाणवत आहे. व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.