राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त  सिन्नर येथील राईट टाईट फास्टनर कंपनीतील १३४ कामगारांना अनोखी भेट 

0

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या  वाढदिवसा निमित्त माळेगांव एम.आय.डी. सी. सिन्नर येथील राईट टाईट फास्टनर कंपनीत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वात यशस्वी पगारवाढ करार आणि  १३४ कामगारांना कायम करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस अंकुश पवार व प्रदेश कार्यकारणी सदस्य संदेश जगताप यांच्या नेतृत्वामध्ये राज ठाकरे यांच्या  वाढदिवसा निमित्त हीअनोखी भेट या कामगारांना देण्यात आली.

Raj Thackeray's birthday Unique gift to 134 workers

कोविड-१९ महामारीच्या प्रादुर्भावामुळे मोठ-मोठ्या कंपन्या पगारकपात आणि कामगारकपातीचे धोरण अवलंबत असताना राईट टाईट फास्टनर मध्ये केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युनियन असल्यामुळे हे शक्य होऊ शकले. गेल्या १८ महिन्यापासुन व्यवस्थापन व कामगारांमध्ये पगारवाढी संदर्भात करार प्रलंबित होता. आज १८ महिन्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या मध्यस्थीमुळे  कामगारांना- ७५००/- एवढी भरघोस पगारवाढ व या व्यतिरिक्त दर सहा महिन्यांनी मिळणारा खास भत्ता (special allowance) देखील कामगारांना देण्यात येणार आहे. अशा स्वरूपात कंपनीकडुन पगारवाढ मान्य करून घेण्यात आली. तसेच २१ जुन्या कामगारांना नोकरी वरून कमी करण्यात आले होते त्यांना सुद्धा कामावर पुन्हा घेण्यात आले.

या पगारवाढीबद्दल राईट टाईट फास्टनर माळेगांव एम.आय.डी. सी. सिन्नर,नाशिक युनियनच्या सर्व कामगारांनी व कामगार कमिटी सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे आणि प्रदेश चिटणीस मा. अंकुश पवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. संदेश जगताप व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासुन खुप-खुप आभार मानले. या प्रसंगी राईट टाईट फास्टनर कंपनीचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे बिपीन निंबाळकर, आकाश बुचडे, शेखर कडभाने, योगेश म्हस्के, सचिन उगले, कमलेश घेगडमल आदि युनिट सदस्य / पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.