आजचे राशिभविष्य शुक्रवार,१९ जुलै २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आषाढ शुक्ल त्रयोदशी. क्रोधीनाम संवत्सर.   
आज चांगला दिवस आहे. *प्रदोष* रविचा पुष्य नक्षत्रात प्रवेश. २१ ते २५, ३०,३१ या दिवशी चांगल्या पावसाची शक्यता आहे.  
चंद्र नक्षत्र – मूळ.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. आज काम पूर्ण करा. प्रवासात सरकारी यंत्रणांकडून विचारणा होऊ शकते. पाण्यापासून सावध रहा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. कायदे पालन करा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. सुखद अनुभव येतील. सरकारी कामे रेंगाळतील. प्रतिष्ठा पणास लागेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. मन आनंदी राहील. मोठेपणा दाखवण्यासाठी खर्च कराल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. प्रगतीची घोडदौड चालू राहील. सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास विलंब होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे.  आर्थिक भरभराट होईल. येणी वसूल होतील. पावसाळी सहल घडेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. अनामिक व्यक्तीकडून लाभ होतील. सन्मान मिळतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  दिवस अनुकूल आहे. धाडसी निर्णय घ्याल. प्रवासातून लाभ होतील. अहंकार टाळा. राजकीय भाष्य नको.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रफुल्लित राहील. मेजवानी मिळेल. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. उत्पन्न वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे.  आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. राजकारणात जपून निर्णय घ्या. शब्द फिरवला जाईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मनाप्रमाणे कामे पार पडतील. गुंतवणूक कामी येईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामाचा वेग वाढेल. उशी वाटेल. पावसाळी सहल घडेल. सामाजिक वजन वाढेल

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.