आजचे राशिभविष्य शुक्रवार,६ सप्टेंबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल तृतीया.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज शुभ दिवस आहे. *हरितालिका*
चंद्रनक्षत्र – हस्त/(सकाळी ९.२५ नंतर) चित्रा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. आज फायद्याचे करार होतील. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. शेअर्स/लॉटरी यात नशीब अजमावून बघा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आध्यात्मिक लाभ होतील. दान धर्म कराल. वक्तृत्व चमकेल. आध्यत्मिक व्यक्तीची भेट होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाची सुरुवात जोरदार होणार आहे. मनासारखी कामे पार पडतील. अनुकूल चंद्र गुरू योग स्वप्ने साकार करतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम सुरुवात आहे. अडचणी दूर होतील. दत्त गुरुची कृपा राहील. नोकरीत चांगले अनुभव येतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. स्वतःसाठी खर्च कराल. महागडे दागिने घ्याल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) शुक्र अनुकूल आहे. चंद्राशी शुक्र आणि गुरू चा शुभ योग आहे. मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. आज सगळी रखडलेली कामे पूर्ण करा. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. भागीदारीत यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीत बढती/बदली होईल. महिलांकडून लाभ होतील. गुरुची नाराजी कमी होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत शुभ दिवस आहे. संतती कडून खुश खबर मिळेल. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थनी चंद्र आहे. फारशी अनुकुलता नाही. कामे रेंगाळतील. विनाकारण कटकटी होऊ शकतात.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आजचा दिवस प्रिय व्यक्तीसोबत व्यतीत कराल. मन आनंदी राहील. हातून चांगली कामे होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.