Rashi Bhavishya Today
राहुकाळ -सकाळी ७.५९ ते सकाळी ९.२५
अश्विन कृ .५
“आज शुभ दिवस आहे”
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी
नक्षत्र -रोहिणी,मृगशीर्ष
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) हुरहूर वाढेल. नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. हौस पूर्ण कराल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चांगला दिवस आहे.अनुकूल ग्रहमान आहे.संवादातून लाभ होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भावंडांशी संवाद होईल.कामानिमित्त फिरावे लागेल. उत्तम लेखन घडेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वक्तृत्व बहरेल. कल्पना सुचतील.मौज कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विनाकारण भ्रमंती होईल.दोषारोप होतील.गैरसमज होऊ शकतात.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) ग्रहमान अनुकूल आहे.भ्रमंती घडेल.प्रवास कार्यसाधक होतील.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभाचा दिवस आहे.अडचणीतून मार्ग काढाल.शब्दास वजन प्राप्त होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामात वाढ होईल. जबाबदारी मिळेल. कृतीतून योग्य संदेश द्याल.
धनु:- (ये, यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) धावपळ होईल. सहकाऱ्यांचा गैरसमज होऊ शकतो.स्पष्ट भूमिका घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) धनलाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. मात्र धावपळ वाढेल.वाहने जपून चालवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मित्रमंडळी भेटतील. विचारांची देवाण घेवाण होईल.लाभदायक दिवस आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. काही कामे मार्गी लागतील.चिकाटी सोडू नका.