ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल प्रतिपदा. क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज करि दिन आहे.
चंद्र नक्षत्र – मृग/आर्द्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) काहीसा कठोर दिवस आहे. बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कौटुंबिक मतभेद संभवतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वागण्यात आणि स्वभावात मृदुता कमी अनुभवास येईल. मेजवानी मिळेल. गरम द्रव पदार्थ पासून काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकूल दिवस आहे. खर्च वाढतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. दबदबा वाढेल. कोर्ट कामात यश मिळेल. स्पर्धेत विजय.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरीत उत्तम यश मिळेल. मनासारखी कामे होतील. मात्र संयम बाळगावा लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज उपासना केल्यास कुलदेवता प्रसन्न होईल. सिद्धी प्राप्त होईल. तीर्थाटन घडेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) फारशी अनुकूलता नाही. मोठी आणि महत्वाची कामे आज नकोत. संध्याकाळ आनंदाची.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) स्पर्धेत यश मिळेल. विरोधक पराभूत होतील. काळजी मिटेल. व्यवसायात यश!
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काळजी घेण्याचा दिवस आहे. आर्थिक लाभ होतील मात्र जोखीम वाढेल. उधारी टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अति धाडस करू नये. मोठी गुंतवणूक टाळा. प्रेमात अपयश संभवते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) घरापासून फारसे दूर जाणे टाळावे. वाहन जपून चालवावे. सामाजिक कार्यात आवश्यकतेपेक्षा अधिक सहभागी होऊ नये.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक बाजू आजही चांगली राहील. मात्र मोठी जोखीम घेऊ नये. विनाकारण इतरांच्या वादात पडू नये.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)