राहुकाळ – दुपारी-४:३८ ते ६:०३
अश्विन कृ – १० शुभ दिवस
नक्षत्र -आश्लेषा
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दशम स्थानातील बुध मेषेतील गुरुशी केंद्र योग करत आहे. कामानिमित्त भ्रमंती घडेल. नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) घरातील जेष्ठ व्यक्तीची सेवा करणे हिताचे आहे. शिक्षणावर खर्च होईल. प्रवासात त्रास संभवतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल गुरू इच्छापूर्ती करेल. अर्थलाभ होईल. हरवलेली वस्तू सापडेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभ होतील. मात्र नोकरीत अधिक कष्ट करावे लागतील. विनाकारण वाद टाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यवसाय वाढेल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) छोट्या सहलीचे बेत आखाल मात्र त्याचे नियोजन बदलू शकते. जेष्ठांची काळजी घ्यावी लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. महिलांकडून लाभ होतील.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जीवनाला कलाटणी देणारा उपदेश मिळेल. सत्संग घडेल. चोरीचे भय आहे. खिसा पाकीट सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वकील, निवेदक, गायक याना शुभ दिवस आहे. प्रश्न सुटतील. संतती शी संवाद साधा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बुद्धी चातुर्य पणाला लागेल. घरासंबंधीत प्रश्न सुटतील. नफा वाढेल.प्रिय व्यक्तीला वेळ द्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहन यांची दुरुस्ती करावी लागेल. लेखनातून यश लाभेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल बुध व्यापारात लाभ मिळवून देईन. वाहन सुख लाभेल. आर्थिक चिंता मिटतील