आजचे राशिभविष्य शनिवार,१ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख कृष्ण नवमी/दशमी. ग्रीष्मऋतू,   
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज क्षय तिथी आहे”  
नक्षत्र: उत्तरा भाद्रपद. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मीन. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानी चंद्र असला तरीही अनुकूल दिवस आहे. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. प्रगतीची घोडदौड चालू राहील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. सर्व महत्वाची कामे आज पूर्ण करा. कलाकारांना मोठे यश लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मनासारखी होतील. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. खर्च वाढले तरी आनंद देखील वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. सर्च शुभ ग्रहांचे संमेलन भरले आहे. स्वप्ने साकार होतील. संधीचे सोने करा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना भेटवस्तू किंवा मेजवानी द्याल. सरकारी कामात गती प्राप्त होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम ग्रहमान आहे. तीर्थयात्रा घडेल. सरकारी कामे मार्गी लागतील. वाहन सौख्य लाभेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. काही सुखद घटना घडतील. स्त्रीधन वाढेल. भेटवस्तू मिळतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम दिवस आहे. सर्वच क्षेत्रात प्रगती अनुभवला येईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यवसाय वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. चांगले अनुभव येतील. हरवलेली वस्तू सापडेल. घरगुती कामे पूर्ण होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. अर्थप्राप्ती होईल. व्यवसायात यश मिळेल. संतती कडून चांगली बातमी समजेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यातून लाभ होतील. वाहन सुख लाभेल. कौटुंबिक सौख्य मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. शुक्र, गुरू आणि रवीशी चंद्राचा लाभ योग् आहे. अनेकोत्तम कामे पार पडतील. मित्रांची सहमती वाढेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.