आजचे राशिभविष्य,गुरूवार,२१ मार्च २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल द्वादशी.शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ -दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र -अश्लेषा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कर्क
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र -हर्षल, गुरू केंद्र योग आहे.बुधाशी शुभ योग आहे.सांभाळून राहणे हिताचे आहे.एखाद्या किरकोळ गोष्टीचा मोठा बाऊ होऊ शकतो.

वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे.प्रतिकूल गुरू,हर्षल मोठ्या खर्चात टाकू शकतात.दानधर्म करा.अनुकूल बुध नवीन ओळखी करून देईल.

मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)अनुकूल दिवस आहे.आर्थिक लाभ होतील.मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.संथपणे वाटचाल कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)कामाच्या ठिकाणी किरकोळ कुरबुरी होऊ शकतात.स्फोटके,रसायने संबंधित ठिकाणी जपून काम करा.

सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे.प्रवासात त्रास संभवतो.खर्च वाढेल.अपघाताचे भय आहे.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)संमिश्र दिवस आहे.चंद्र अनुकूल आहे.तो उत्साह देईन. व्यापारात नुकसान संभवते.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) समविचारी लोकांशी संवाद साधा. मनाचा एकटेपणा दूर होईल.कामाच्या ठिकाणी मन एकाग्र होणार नाही.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शेअर्स मधून लाभ होतील.प्रवास कार्यसाधक होतील.आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे.कामानिमित्त भ्रमंती होईल. पाळीव प्राण्यांवर प्रेम उफाळून येईल.संततीशी मतभेद संभवतात.

मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक कामास वेळ द्यावा लागेल.लेखनातून लाभ होतील.घरगुती कटकटी चा सामना करावा लागेल.

कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. भावंडांशी वाद होऊ शकतात. बौद्धिकतेच्या जोरावर अडचणींवर मात कराल.

मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुम्ही चतुर आणि बुद्धिमान असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होईल.शेअर्स मधून लाभ होतील.कौटुंबिक कलह टाळा.

(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”याफेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.