रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड

२५ वर्षांच्या राजकीय प्रवासाची फलश्रुती

1

मुंबई, १ जुलै २०२५ – Ravindra Chavan BJP President भारतीय जनता पक्षाचे (BJP Maharashtra) नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या वरळी येथील कार्यकर्ता मेळाव्यात या ऐतिहासिक घोषणेसोबतच त्यांच्या नेतृत्वात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

🔹 पक्षनिष्ठेचा आदर्श
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या विचारधारेने घडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांच्या नावाची घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

🔹 राजकीय भविष्याची दिशा
भाजपचे १२ वे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारताना चव्हाण यांनी सांगितले की, “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हा भाजपा कुटुंबाचा मूलमंत्र कायम ठेवत, अंत्योदयाचा मार्ग माझा ध्येयविवेक राहील.” आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला राज्यात क्रमांक एक बनवणे हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख उद्दिष्ट राहील.

🔹 कोण आहेत रवींद्र चव्हाण?(Ravindra Chavan BJP President)
राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, केवळ विचारधारेशी निष्ठा, प्रामाणिक मेहनत आणि संवादकौशल्याच्या जोरावर रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये आपल्या राजकीय अस्तित्वाची ठळक छाप सोडली आहे.

2002 मध्ये भाजप युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष

2005 मध्ये नगरसेवकपदाची पहिली निवड

2009 पासून सलग चार वेळा आमदार (डोंबिवली विधानसभा)

2016–2019 मध्ये विविध खात्यांचे राज्यमंत्री

2020 मध्ये भाजपचे प्रदेश महामंत्री

2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

🔹 ठळक कामगिरी:
‘आनंदाचा शिधा’ आणि ‘रेशन आपल्या दारी’ यांसारख्या नाविन्यपूर्ण योजना.

सावरकर पुतळा स्थापनेसाठी मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाला पाठिंबा.

कोकणात भाजपच्या विस्तारात मोलाचा वाटा.

रायगड, पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून कार्य.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!