राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार
मुंबई – महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याचा मोठा निर्णय झाला असून येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. ग्रामीण भागातील ५ ते १२ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे
कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत.मात्र विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सक्ती नसेल.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील जवळपास सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत सुरू आहेत. केवळ शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यावर आता मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे.
The schools in Maharashtra will reopen from October 4th. Chief Minister Uddhav Thackeray has approved this, the task force and health department have also approved the decision of reopening schools in the state: Varsha Gaikwad, Maharashtra Minister for School Education pic.twitter.com/HD9GVigOnH
— ANI (@ANI) September 24, 2021