शिर्डी विमानतळावरची विमान सेवा आजपासून सुरु : ‘या’ शहरातून विमानं शिर्डीत उतरणार

0

शिर्डी-संपूर्ण भारत आता अनलॉक होतोआहे.आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबरआहे.कोरोनामुळं गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरची सेवा आजपासून पुन्हा सुरु होतआहे.

आज सकाळी ११:३० वाजता दिल्लीहून पहिले विमान शिर्डी विमानतळावर दाखल होणार असून हेच विमान पुन्हा १२:३० वाजता दिल्ली साठी उड्डाण करणारआहे.कोरोनामुळं खंडीत झालेली विमानसेवा पूर्ववत होत असल्यानं साईभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सरकारने ७ ऑक्टोबर म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून धार्मिक स्थळं सुरु करण्यास परवानगी दिलीहोती.त्यामुळे मंदिरांची दारं उघडली आहेत. मंदिरं सुरु झाल्यानं भाविकांना आता शिर्डीतील साईबाबांचं दर्शनसुद्धा घेता येणार आहे.

लॉकडाऊनचा परिणाम अनेक गोष्टींवर झालाआहे.अशातच कोरोना प्रादुर्भावात शिर्डी विमानतळावरील विमान सेवा बंद करण्यात आली होती परंतु आजपासून दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईमधून साईभक्तांना घेऊन विमानं शिर्डी विमानतळावर उतरणार आहेत.

सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीहून, दुपारी अडीच वाजता हैदराबादहून तर दुपारी चार वाजता चेन्नईवरुन आलेल्या विमानाचं शिर्डी विमानतळावर लँडिंग होणार आहे.

शिर्डी विमानतळावर आजपासून स्पाईसजेट, इंडिगो एअरलाइन्सची सेवा दिल्ली हैदराबाद आणि चेन्नई ठिकाणसाठी असणार आहे. त्यानुसार विमानाचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यापूर्वी हे वेळापत्रक पाहावं लागणार आहे.

शिर्डी विमानतळावर विमानांचं वेळापत्रक

* १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता दिल्ली येथून शिर्डीत पहिलं विमान दाखल होणार

* दुपारी १२.३० वाजता हेच विमान दिल्लीकडे उड्डाण करणार आहे.

* दुपारी २.३० वाजता हैदराबाद येथून शिर्डीत विमान येणार असून दुपारी ३ वाजता पुन्हा हैदराबादला जाणार

* दुपारी ४ वाजता चैन्नई येथून शिर्डीत विमान येणार असून दुपारी ४.३० वाजता पुन्हा चैन्नईकडे रवाना होणार

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.