मुलगा आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहचला आर्थर रोड जेलमध्ये

0

मुंबई-बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आज आपला मुलगा आर्यन ला भेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहचला. मुला सोबत अगदी काहीकाळ त्याला चर्चा करायला वेळ मिळाल्यानंतर तेथून तो लगेच रवाना झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नातेवाईक किंवा वकील हे कैद्यांना प्रत्यक्ष भेटू शकतनव्हते.परंतु आजपासून भेटीची परवानगी पुन्हा देण्यात आली आहे. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शाहरुख ऑर्थर रोड कारागृहात पोहोचला. नियमानुसार, एकावेळी कैद्याचे केवळ दोनच नातेवाईक भेटू शकणार आहेत. मात्र, शाहरुख एकटाच आर्यनला भेटण्यासाठी पोहोचला.

३ ऑक्टोबर रोजी कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी दरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर ७ जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं आहे. सध्या आर्यन खानच्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. मात्र त्याला जामीन अजूनही मिळाला नाही.

काल झालेल्या सुनावणीमध्ये त्याचा जमीन अर्ज फेटाळला आहे. त्यांनतर आर्यन खानचा वकिलाने मुंबई हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर तातडीची सुनावणी घेण्याची विनंतीही केली आहे. ती विनंती मान्य होणार का आणि आर्यनला जामीन कधी मिळणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंआहे.आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.

आज सकाळी शाहरुख खान सकाळी आर्थररोड जेल मध्ये पोहचल्या नंतर त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ऑर्थर रोड परिसरात मीडियानं प्रचंड गर्दी केली होती. मात्र, शाहरुखनं मौन सोडलं नाही. कारागृहाबाहेर उपस्थित असलेल्या अन्य कैद्यांच्या नातेवाईकांना हात जोडून तो निघून गेला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.