‘सोर्स म्युझिक’ स्टुडिओ मध्ये नवोदित आणि गरजू कलाकारांना मिळणार विनामूल्य डबिंग सेशन

0

नाशिककोरोनाच्या काळामध्ये सगळीकडे खूप बदल घडले, कलावंतांच्या जीवनातही अनेक स्थित्यंतरे झालीत, गायनाच्या मैफिलींसोबत रेकॉर्डिंग स्टुडिओ देखील बंद करण्यात आले होते. त्याचा सकारात्मक उपयोग करत, संगीतकार गायक संजय गीते यांनी आपल्या ‘सोर्स म्युझिक’ स्टुडिओ चे नूतनीकरण केले. हल्लीचा काळ लक्षात घेता स्टुडिओ मध्ये  नवोदित आणि गरजू कलाकारांसाठी एक विनामूल्य डबिंग सेशन सेवेचा प्रारंभ आणि नूतनीकरण निमित्त स्टुडिओ चा उद्घाटन सोहळा सुप्रसिद्ध गायिका सारेगामा लिटिल चॅम्प विजेती अंजली गायकवाड यांच्या शुभहस्ते  करण्यात आले,

त्यामध्ये काही तांत्रिक सुविधा आणि ऍकॉस्टिक मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले.ह्या वेळी अंजलीचे गुरू पिता अंगद गायकवाड  ह्यांनी त्यांच्या कुटुंबाचा स्वर प्रवास कथन केला तसेच सोर्स स्टुडिओ आणि सप्तरंग सामाजिक संस्थेच्या शेतकरी, विद्यार्थी साठीच्या मनशक्ती संगीत अशा लोकोपयोगी कामाचे कौतुक केले,नंदिनी गायकवाड ह्यांनी बिहाग रागातील लट उलझी सुलझा ही बंदिश गायिली  याप्रसंगी अंजली गायकवाड, गायिका नंदिनी गायकवाड, श्री अंगद गायकवाड सोर्स स्टुडिओ संचालक संगीतकार-गायक संजय गीते ,सप्तरंग बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी राजेश पाटील,किशोर सुतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.