भारतात लसीकरणाने ओलांडला १०० कोटी टप्पा

0

नवी दिल्ली -देशात करोनाविरुद्ध लसीकरणाच्या माध्यमातून लढाई सुरू असतांना या लढाईत भारताने एक इतिहास आहे. लसीकरण मोहिमेत देशाने एक महत्त्वाच्या टप्पा गाठलाआहे.या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट साध्य झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर असून भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

देशात कोरोनाच्या लसीकरणाला १६ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज १०० कोटी डोस पूर्णझाले.केंद्र सरकारने हे एक मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. करोनाच्या या महामारीत एकेकाळी लसीही उपलब्ध नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावेलागले.पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केल्या जात होत्या. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे.

आतापर्यंत, १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५ कोटी २९ लाख ४४ हजार ०२१, ४५ ते ५९ वयोगटातील २६ कोटी ८७ लाख ६५ हजार ११० आणि ६० वर्षांवरील १६ कोटी ९८ लाख २४ हजार ३०८ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांसह २३ मनपा क्षेत्रांमध्ये काल कोरोनामुळं एकही मृत्यू नाही

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचं दिसत आहे. काल बुधवारी महाराष्ट्रातील तब्बल २७ जिल्हे आणि २३ महापालिकाक्षेत्रांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू झाला नसल्याचं सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. मुंबई उपनगरातील ठाणे जिल्ह्यासह सात उपनगरांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. तर नाशिक मंडळातील अहमदनगर जिल्ह्यात दोन आणि नाशिक शहरात दोन मृत्यू वगळता इतर जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. विदर्भातील एकाही जिल्ह्यात काल कोरोनामुळं कुणालाही जीव गमावावा लागलेला नाही. राज्यात काल १८२५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एकूण २१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ४ मृत्यू हे सातारा जिल्ह्यात झाले असल्याची नोंद आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.