सावाना व नागरिक शिक्षक गौरव समिती तर्फे रविवारी २६ गुरुजनांचा सन्मान

0

नाशिकसार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे गेल्या ५१ वर्षापासून देण्यात येणारे शिक्षक पुरस्कार  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी  यांच्या हस्ते २६ गुणवंत शिक्षकांचा गौरव रविवार दि. २४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. वाचनालयाच्या प. सा. नाट्यगृह येथे होणार आहे.  

 
कविश्रेष्ठकुसुमाग्रजांनी सुरु केलेला हा सोहळा वाचनालयाची नागरिक शिक्षक गौरव समिती दरवर्षी करीत असते. भारतभरात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तिमत्वांनी आजवर याकार्यक्रमासाठी उपस्थिती लावली असून एक मोठा शिक्षण विचार या निमित्ताने नाशकात रुजला आहे. 
Milind Joshi
मिलिंद जोशी


या सोहळ्याचे यंदाचे ५१ वे वर्ष असून  मिलिंद जोशी यांचे विचार या सोहळ्यानिमित्त नाशिककरांना ऐकावयास मिळणार आहेत. सर्व पुरस्कारार्थीचे नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष डॉ.यशवंतराव पाटील तसेच वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा.सचिव प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे आणि कार्यकारी मंडळसदस्यांनी अभिनंदन केले.


या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणारे शिक्षक पुढीलप्रमाणे 

१ )
 प्राथमिक  
 
१ – छाया नामदेव माळी- मनपा शाळा क्र.६७, काठे गल्ली, नाशिक २ – अनंत तुळशीराम शिंदे – मनपा शाळा क्र. १३,
हिरावाडी, नाशिक ३ – वासुदेव पुंडलिक बधान –उन्नती प्राथमिक विद्यालय, पंचवटी, नाशिक ४ – मोहन बाजीराव माळी – मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, पखाल रोड.

२ ) माध्यमिक 
 
१ – रोहित रामदास गांगुर्डे – ज्योती विद्यालय, पिंपळगाव(बहुला) नाशिक २ – राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी – बिटको गर्ल्स हायस्कूल, नाशिक ३ – सौ.मुग्धा राजेंद्र जोशी – र.ज.चव्हाण बिटको गल्स हायस्कूल, नाशिकरोड ४ – सौ. जूईली चारुदत्त शेरीकर – डी.एस.कोठारी कन्या शाळा, नाशिकरोड

३ ) उच्च माध्यमिक 
 
 डॉ. संजय खंडेराव शिंदे – के.टी.एच.एम.महाविद्यालय, नाशिक

४ ) महाविद्यालयीन 
 
१ प्रा.डॉ. विक्रम रघुनाथ काकुळते – के.टी.एच.एम.महाविद्यालय, नाशिक २ – डॉ. कविता संजय पाटील – एस.एम.आर.के. महिला महाविद्यालय, नाशिक ३ – प्रा.डॉ.संजय निवृत्ती तुपे – के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक

५ ) संत साहित्य अभ्यासक 
 
१ – डॉ. उल्हास रत्नपारखी

६ ) क्रीडा शिक्षक  

 
१ – योगेंद्र शिवाजीराव पाटील – कै.बिंदू रामराव देशमुख कला महाविद्यालय, नाशिकरोड.

७ ) कला शिक्षक 
 
 १ – सोमेश्वर रघुनाथ मुळाणे – श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय, मखमलाबाद.

८ ) विशेष चित्रकला
  
 
१ – मनिष जोगळेकर – पेठे विद्यालय, नाशिक

९ ) शास्त्रीय संगीत  
 
१ – आशिष विजय रानडे – कलाश्री संगीत विद्यालय, नाशिक

१० ) मुख्याध्यापक  
 
१ – अनिल बाळकृष्ण नागरे – वनिता विकास मंडळ माध्य., विनय नगर

११ ) विशेष कार्य पुरस्कार 
 
१ – उत्तम श्रावण तांबे २ – श्रीमती शुभदा देसाई

१२ ) व्यावसायिक 
 
 १ – अनिल रामदास भंडारे – के.टी.एच.एम.महाविद्यालय, नाशिक

१३ ) संशोधक अध्यापक  
 
डॉ. किरण हरिभाऊ रकिबे – एस.व्ही.के.टी. कॉलेज, देवळाली, नाशिक

१४ ) व्यावसायिक विद्याशाखा  
 
डॉ. सुनिल यादवराव कुटे – के.के.वाघ इंजि. महाविद्यालय, नाशिक

१५ ) सेवानिवृत्त 

प्राथमिक विभाग – श्रीमती प्रमिला भिवाजी पाटील – वाघ गुरुजी विद्यालय, नाशिक.

माध्यमिक विभाग – आबासाहेब घाडगे – डी.डी. बिटको बाईज स्कूल, नाशिक

महाविद्यालयीन विभाग – प्रा. विठ्ठल सहादू मोरे – पंचवटी महाविद्यालय, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.