हरिअनंत,नाशिक
मीन राशीच्या जन्मपत्रिकेतील गुरू बिघडलेला असेल,तर साडेसातीत खूप त्रास होतो.अर्थात गुरू किती बिघडलेला आहे. हे पत्रिकेतील स्थितीवर अवलंबून आहे आणि साडेसातीत प्रत्येकालाच त्रास होतो असे ही नाही. साडेसातीत त्रास होणे न होणे हे सर्वस्व ज्याच्या- त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. आपले कर्म उत्तम असेल, तर साडेसाती सुरू होण्यापूर्वी आणि साडेसाती सुरू झाल्यानंतर घाबरण्याचे कारण नाही.
मुळात मीन राशीचा स्वामीच गुरू आहे. गुरू जन्मपत्रिकेत उत्तम असेल आणि सोबतीला आपले कर्म उत्तम असेल तर मुळीच घाबरण्याचे कारण नाही. मात्र जन्मपत्रिकेतील गुरू उत्तम नसेल आणि तो पूर्णतः बिघडलेला असेल, आपले कर्म चांगले नसेल तर निश्चितचं चिंताजनक स्थिती आहे. आपण त्वरित सावधानतेने कर्म केली पाहिजे. आपले गुरू- सद्गुरू असतील तर त्यांची, गोमातेची,कुत्र्याची ,आपल्या जन्मदात्या माता-पित्याची सेवा केली पाहिजे.
नियमित गुरूदत्तात्रयाचे दर्शन घेऊन आपण केलेल्या चुकीच्या कर्माची माफी मागितली पाहिजे. अर्थात मीन राशीत गुरूला चांगले फल देण्यास हरकत नाही मात्र हा गुरू 1,4,5,9,10,12, या ह्या स्थानात फलितांच्या दृष्टीने बलवान समजावा. अशा स्थितीत पूर्वभाद्रपदा चतुर्थ चरण,रेवती नक्षत्र प्रथम चरण वा चतुर्थ चरणात असल्यास ह्या गुरूला विशेष करून सांपात्तिक अधिष्ठान द्यावे. मीन राशीत गुरू असणे म्हणजे अत्यंत मंद गतीने का म्हणाना सांपात्तिक स्थिती सुधारण्याचे दोत्तक समजावे.
सप्तमातील मिनेचा गुरू विशेषतः बिघडलेला असेल ( म्हणजे हर्षल नेपच्यून, शनि व मंगळाने) स्त्रीसुखाच्या दृष्टीने चांगला नाही.सर्व ग्रहामध्ये गुरू या ग्रहाला लौकीकदृष्ट्या फार महत्व आहे. प्रत्येक कार्यात कामात गुरू कसा आहे हे पहिले जाते. कोणतेही शुभकार्य उपनयन, विवाह गुरु बलाशिवाय करीत नाही. गुरू अस्तामध्ये कोणतेही शुभकार्य आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे होऊ शकत नाही. गुरू विश्वातील संत स्वरूपाचा कारक आहे. गुरूला ही “जीव” संज्ञा आहे म्हणून विश्वातील चित्त ही संज्ञा आहे. म्हणून विश्वातील “चित्त” शक्तीचा कारक गुरू आहे.
आता गुरू सच्चित जाहला, त्या खेरीज गुरू तेजोरूपी आनंद आहे. म्हणून गुरू सच्चिदानंद आहे. मालिकेत गुरू सच्चिदानंदरूपी आहे.आपल्या संसारयात्रेत सच्चिदानंदाचे अधिष्ठान असल्याखेरीज शांतता व समाधान असणार नाही म्हणून प्रत्येक कार्यात गुरू पाहणे इष्ट आहे. असा सच्चिदानंदमय गुरू मीन राशीचा स्वामी आहे..असा शुभ संबंधित गुरू मीन राशीत असेल,तर(क्रमशः) भाग -१४८
शुभम भवतु …
मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत