शनिशास्त्र : साडेसाती आरंभ होण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी

हरिअनंत,नाशिक

0

हरिअनंत,नाशिक

मीन राशीला लागणाऱ्या साडेसातीचा परिणाम टाळण्यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे आपली जन्मपत्रिका उत्तमरीत्या जाणून घेतली पाहिजे.जन्मपत्रिकेत मीन राशीचा स्वामी ‘गुरू’ खुश आहेत की नाराज हे जाणून घेतल्या शिवाय मीन राशीला लागणाऱ्या साडेसातीचा परिणाम मीन राशीच्या सर्व व्यक्तींवर सारखाच परिणाम होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मीन राशीच्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत असलेले ग्रह आणि आणि त्यात मीन राशीचा स्वामी गुरु चांगला आहे की बिघडलेला हे बघणे ज्यास्त महत्वाचे आहे.शनी पत्रिकेत कसा आहे. हे ही बघणे तितकेच महत्वाचे आहे.

मीन राशीचा स्वामी गुरू जन्मपत्रिकेत जर उत्तम असेल, तर साडेसातीत मीन राशीला त्रास होत नाही. मीन राशीत गुरू चांगले फल देतो मात्र हा मीन राशीचा स्वामी गुरू 1,4, 5,9,10,11 ह्या स्थानात फळ8ताच्या दृष्टीने अतिशय बलवान समजावा.

अशा स्थितीत पूर्वाभाद्रपदा चतुर्थ चरण, रेवती नक्षत्राचे प्रथम चरण अथवा चतुर्थ चरणात असल्यास ह्या मीन राशी स्वामी गुरूला विशेष करून सांपत्तिक अधिष्ठाण द्यावे. मीन राशीत गुरू असणे म्हणजे अत्यंत मंद गतीने का म्हणाना मीन राशीच्या व्यक्तीची सांपत्तिक स्थिती सुधारण्याचे द्योतक समजावे. मीन राशीत गुरू बऱ्याच वेळा पुरुष आणि स्त्री संतती सारख्या प्रमाणात झालेली पहावयास सापडते.

सप्तमातील मीनेचा गुरू विशेषतः बिघडलेला ( म्हणजे हर्षल नेपच्चून,शनी वा मंगळाने) स्त्रीसुखाच्या दृष्टीने चांगला नाही. मकरस्थानात म्हणजे द्वितीय आणि सप्तमस्थानात गुरू व शुक्र स्वगृहीचे पडतील तर ते बऱ्याच वेळेस आयुष्यात केंव्हा तरी त्या स्थानाबद्दल प्रतिकूल वातावरण उत्पन्न करतात. हा नियम काही वेळा अनुभवास येतो.

शनि मीन राशीत हा एक महत्वाचा शनी. व्यक्तीचा मानसशास्त्रीय पिंड व घडण समजणे कठीण असते. शनी मंगळाने व राहूने बिघडलेला असल्यास एक विचित्र योग कुंडलीत होतो. असा योग मीन राशीच्या कुंडलीत झाला असेल तर अशा योगामुळे साडेसातीत खूपचं त्रास होतो.अशा स्थितीत या व्यक्ती कशाला तरी भितात. कशाला म्हणून विचाराल, तर त्यांचे उत्तर ते सुध्दा देऊ शकत नाहीत. त्यांचं मन सतत गोंधळलेल्या स्थितीत घाबरलरलेले असते. काहीतरी संकट येत आहे, आपले काहीतरी वाईट होणार आहे. अशा अशा विचारात नेहमी गुंतलेले असतात.

ह्या मीन राशीच्या व्यक्ती देवावर विश्वास ठेवतातही आणि नाहीही. मीन राशीच्या जन्मपत्रिकेत गुरु उत्तम असतो त्या व्यक्ती अतिशय धार्मिक असतात.ह्या बाबतीत गुरुशी संबंधित शनी या राशीत असल्यास (क्रमशः) भाग -१४६

मीन राशीला लागणाऱ्या साडेसाती विषयी,मीन राशी सोबत असणाऱ्या इतर ग्रहयुती व त्यांचा साडेसातीत होणारा परिणाम ‘ साडेसाती आरंभ होण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी मीन राशीचा स्वामी गुरूव गुरुची कृपाप्राप्ती विषयी

शुभम भवतु …

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,
हरीअनंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.