गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण…

0

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन खास, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणजेच गायत्री आणि मीरामध्ये टास्क दरम्यान जोरदार भांडण होताना दिसणार आहे. गायत्रीच्या एका निर्णयामुळे यांची मैत्री तुटणार ? नक्की काय झाले? या वादावादीमध्ये गायत्रीचा देखील पारा चढला आणि भांडण अजूनच वाढत गेले… नक्की काय झालं हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, मीराला हार पचवता येतं नाही हे मात्र खरं.

टास्कसाठी सगळेच सदस्य सुंदर तयार होऊन सज्ज आहेत… बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना दोन टिम्समध्ये विभागले आहे म्हणजेच TEAM A आणि TEAM B. कोणती टीम विजयी ठरणार याचा निकाल गायत्री लावणार असे प्रोमोमध्ये दिसून येते आहे. घरातील सदस्य छान perform करताना दिसत आहेत… गायत्रीने यामध्ये जाहीर केले, टीम A ला मला हा चान्स द्यावा असं वाटतं आहे. त्यावर मीराने रागाने सांगितले मी स्टेज सोडणार नाही. वाचा आधी नीट आणि मग सांगा… त्यावर गायत्रीचा पारा देखील चढला आणि ती मीराला म्हणाली, आरडाओरडा कमी कर…बस चल तिकडे. आणि यानंतर वाद वाढतच गेला. बघूया आज घडणार टास्कमध्ये.

विकास – मीनल चर्चा !

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सोनाली आणि मीनलच्या चर्चेनंतर, मीनल विकासला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण, विकासला कुठेतरी तिचे म्हणणे पटत नाहीये असे दिसून येते आहे.

मीनल विकासला सांगताना दिसणार आहे, माझं असं म्हणणं आहे, मस्करी मस्करीमध्ये थोडं जास्त होतं आहे… जाऊ दे विकास कारण का त्रास होतो आहे तिला चांगलं नाही वाटतं आहे. विकास त्यावर म्हणाला, आता मी आजचा incidence तुला सांगू… मीनल म्हणाली, नको करूस. प्लीज. विकास त्यावर म्हणाला, कारण मी करेक्ट आहे हे तुम्हांला ऐकायचंच नाहीये. तुम्हांला हे सिध्द करायचे आहे तू चूक आहेस. मीनल म्हणाली, असं काही नाही. याच्यापुढे नको करू. माझं तुला हे सांगण आहे, यापुढे तुला जे योग्य वाटेल ते कर विकास. विकास म्हणाला, मला जे योग्य वाटेल ते मी करणार आणि तुला जे योग्य वाटेल ते तू करणार ठरलं आहे ना … मीनल म्हणाली, नको वाढवूस त्या गोष्टी पर्सनल लेवलवर. विकासला वाटते आहे त्याला व्हिलन बनवत आहेत… त्याचे मीनलला सांगणे आहे तू त्याच्यात सामील नको हाऊस आता हे भांडण, गैरसमज अजून किती वाढणार, एकमेकांना हे समजून घेणार का ? हे प्रश्न आहेतच.

बघूया पुढे काय झाले आजच्या भागामध्ये. बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.