त्वचाविकार : त्वचाविकारावर आयुर्वेदिक उपचार पद्धती

डॉ.राहुल रमेश चौधरी 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 
आज अनेक त्वचाविकाराचे रुग्ण समाजात आढळतात व त्वचाविकाराचे सर्व रुग्ण समाजात निंदनीय असण्यास पात्र ठरतात.समाजात हे सर्वच रुग्ण नेहमीच उपहासास पात्र राहतात.हे चूकीचे आहे याकरीता समाजाने बदलने गरजेचे ठरते.पण त्वचाविकार हे आयुर्वेदाने व्यवस्थित बरे होतात.पांढरे डाग(कोड)(vitiligo), कुष्ठ(psoriasis), अंगावर पांढरे डाग पडणे,इसब या प्रकारचे अनेक असे कष्टकारक त्वचाविकार आहेत.याव्यतिरिक्त अनेक लहान लहान असे त्वचाविकार देखील आहेत जे सहजसाध्य आहेत.

१.त्वचाविकाराची कारणे काय ?

-विरुध्द अन्नाचे सेवन करणे उदा.दूध व अन्न एकत्र सेवन करणे,दूध+मांस एकत्र खाणे,दूध मासे एकत्र खाणे,दूध+फळ एकत्र खाणे,मिल्कशेक,दूध-गुळ इत्यादी.

-उलटी,लघवी,शौच,शिंका,रडणे इत्यादी वेगांचे धारण करणे म्हणजेच ते वेग रोखणे

-अतिप्रमाणात जेवणानंतर लगेच व्यायाम करणे,अतिप्रमाणात आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचे सेवन करणे.

-एकावर एक अन्न सेवन करणे

-थंड गरम असे आलटून पालटून पदार्थ खाणे

-भोजन केल्यावर लगेच मैथुन करणे

-दिवसा झोपणे,रात्री उशिरा पर्यंत जागरण करणे

-नवीन धान्य,उडीद,मासे,तीळ ,दही यासारख्या पदार्थांचे सेवन करणे

-कच्चे ,न शिजलेले अन्न सेवन करणे

-नागीण,गोवर,कांजण्या,कावीळ,वारंवार अम्लपित्त(acidity),gout(युरिक ऍसिड वाढणे) यासारखे आजार असणे

-अतिशय आंबट-खारट-तिखट पदार्थांचे सेवन करणे

-आंबवलेले,तेलकट,तिखट,मसाल्याचे पदार्थ खाणे

-मोड आलेल्या कडधान्यांचे अतिप्रमाणात सेवन करणे

-दूध नासवलेले पदार्थांचे रोजच्या रोज सेवन

-अग्निच्या संपर्कात जास्त काळ राहणे व यानंतर लगेच अतिशय थंड पाणी सेवन करणे

-शरीरात आवश्यक घटकांची कमतरता असणे.उदा.मेलॅनीन पिगमेंट,जीवनसत्व ड ,जीवनसत्व बी-१२ इत्यादी.

-जेवणाच्या वेळा अनियमीत असणे

-याशिवाय आयुर्वेदाचा मार्ग आध्यात्मिक मार्गातून जात असल्याने आई-वडील-गुरु यांचा द्वेष निंदा करणे इत्यादी.

-तंबाखू,मद्य,विडी यासारखे व्यसन अधिक प्रमाणात करणे.

-कुंकू,टीकलीचा गोंद,केसांना लावायची मेहंदी अंगावर उभारणे

हे कारणे त्वचाविकार घडण्यास कारणीभूत ठरतात.

२.त्वचाविकार कोणकोणते ?

-सोरियासिस,त्वचा माशाच्या खवल्याप्रमाणे दिसणे(plantar,scalp,plaque,guttate,inverse,pustular,erythrodermic,nail psoriasis,psoriatic arthritis)

-इसब(dry-wet eczema)

-पांढरे कोड(vitiligo)

-अंगावर पूरळ येणे

-अंगावर पांढरे डाग निर्माण होणे

-हातापायाला भेगा पडणे त्यातून पाणी वाहणे(rhagaedes)

-चिखल्या होणे

-अंगावरची त्वचा झडणे,त्वचेचा कोंडा होवून पडणे

-त्वचेवर कुंकू,टीकलीचा गोंद याने काळे डाग उभारणे

-अंगावर वारंवार पित्त उभारणे(urticaria)

-अंगावर काळे डाग पडणे

-lichen plannus

-ringworm/tinea/scabies/erysipales

असे अनेक प्रकारचे वेगवेगळे त्वचाविकाराचे रूप दिसतात.म्हणजेच त्वचाविकार अनंत प्रकार असतात ते लक्षणानुसार बदलतात.

३.त्वचाविकारांचे लक्षण कोणते ?

-अंगाला भरपूर घाम सुटणे किंवा अजिबात घाम न येणे

-अंगावर बारिक बारिक लालसर पूरळ येणे

-अंगावर अनेक लहान लहान प्रकारचे व्रण तयार होणे त्यातून पू,रक्त वाहणे.

-त्वचा काळवंडणे,त्वचेचा वर्ण बदलणे

-त्वचेची आग होणे

-त्वचेची संवेदना जाणे,त्वचा बधिर होणे

-त्वचेला खाज येणे

-त्वचेचा स्पर्श अतिशय खरखरीत किंवा अतिशय गुळगुळीत असणे

-व्रण तयार होणे त्यात जंताची निर्मिती होणे,व्रण लवकर न भरणे,थोड्या कारणाने सुध्दा व्रण (जखमा) तयार होणे

-व्रण (जखम) लवकर पसरणे

अशी अनेक विविध रुपातली लक्षणे वेगवेगळ्या त्वचा विकारानुसार दिसतात.

४.त्वचाविकारा करीता तपासण्या कोणत्या ?

-त्वचाविकार हा असा आजार आहे की ज्यात साधारणत: तपासण्या मध्ये काहीही येत नाही.अनेक वेळा आधुनिक शास्त्रानुसार अनेक वेळा त्वचेच्या तुकड्याची तपासणी,रक्ताच्या तपासण्या,ऍलर्जी च्या तपासण्या केल्या जातात,पण आयुर्वेद मात्र वेगळ्याच मार्गाने जातो.आयुर्वेद हा दोष,सात धातु,तीन मल यावर अवलंबून आहे.त्यावरच परिक्षा करून आयुर्वेद त्वचाविकार बरा करतो.

५.आयुर्वेदानुसार त्वचाविकाराचे उपचार कसे केले जातात ?

-नेहमीप्रमाणे

अ)औषधी उपचार

ब)पथ्यपालन

क)पंचकर्म उपचार

ड)रसायन

या ४ भागातून त्वचाविकाराचे उपचार जातात.

आयुर्वेद हा वात,पित्त,कफ,रस,रक्त,मांस,मेद,अस्थि,मज्जा,शुक्र,ओज,मल,मूत्र,घाम या १४ गोष्टींवर अवलंबून आहे.आयुर्वेदाच्या उपचारांचा हा राजमार्ग आहे.ज्याप्रमाणे ड्रेनेज चा एक भाग बंद झाला असता पूर्ण ड्रेनेज लाईन च बंद होते त्याप्रमाणे शरीरातील ही १४ घटकांची लाईन जोवर स्वच्छ होत नाही तोवर आजार बरे होत नाही.या १४ घटकातील बिघाड म्हणजेच आजार निर्मिती होय.

त्वचाविकार हा स्वतंत्र विचार आहे.शरीरातील सर्व आजार हे पचन संस्थेतून निर्माण होतात.त्याप्रमाणेच त्वचाविकार देखील पचनसंस्थेच्या बिघाडातूनच निर्माण होतात.याकरीता आपण पचनसंस्था थोडक्यात समजावून घेवूयात.

काय आहे पचनसंस्था ?

-पचनसंस्था ही पोट,आतडे,यकृत अश्या अनेक महत्वाच्या अवयवांपासून तयार झालेली आहे.तोंडापासून ते गुदमार्गापर्यंत या पचनसंस्थेचा विस्तार आहे.मनुष्याची पचनसंस्था ही साधारणत: २ ते ४ तासाच्या दरम्यानचा प्रवास आहे.यात सुरुवातीचे पचन हे तोंडापासून ते पोटापर्यंतचा प्रवास आहे १ तासाचा.यात पहिल्या १ तासात योग्य असा कफ तयार होतो.याने चावून चावून खाल्लेल्या अन्नाचा गोळा तयार होणे व तो योग्य अन्नाचा गोळा हा लहान आतड्यात उत्तम पचनाकरीता सोपावणे.याठिकाणी अन्न साधारण १ ते ११/२ तासांचा वेळ घालवते.येथे उत्तम पित्ताचा स्त्राव होतो व अन्नाचे पचन उत्कृष्ट होण्यास सुरुवात होते.येथे येणारे पित्त हे यकृताकडून पित्त नलिकेमार्फत येते.येथून पुढे हे अन्न मोठ्या आतड्यात सरकते येथेच उत्तम,अनुत्तम भागाचे विवेचन केले जाते चांगले ते शोषले जाते व नित्कृष्ट ते मल मूत्र व घामावाटे  बाहेर टाकले जाते.आपण नित्कृष्ट भागाचे तर बघितले पण सारभूत भागाचे काय तर सारभाग म्हणजेच आधुनिक शास्त्रानुसार कर्बोदके,प्रथिने,मेद,जीवनसत्वे,इलेक्ट्रोलाईट्स व आयुर्वेद शास्त्रानुसार सप्तधातु होय.

-कसा होतो त्वचाविकार ?

तुम्ही म्हणाल याचा व त्वचाविकाराचा संबध तो काय?आता मग यातूनच त्वचाविकाराचे आजाराचे मूळ शोधता येईल.जेथे आपण पचनाचा पहिला तास बघितला.तेथेच जर अतिरिक्त कफाचे उत्सर्जन झाले व जेवणाच्या काळात भरपूर पाण्याचे सेवन झाले तर जसे कोरड्या असलेल्या धुळीच्या जागेत पाऊस पडल्यास जसा चिखल तयार होतो त्याचप्रमाणे अतिरिक्त कफाच्या असण्याने अन्नाचे सुरुवातीच्या २ तासातले पचन बिघडते व त्यातून खराब अश्या कफाची निर्मीती होते.व त्याने उत्तरोत्तर पचनात बिघाड होवून खराब धातुंची निर्मीती होते.व योग्य मलाची लक्षणे आहेत त्याप्रमाणे मल तयार न होता खराब लक्षणे असलेल्या मलाची निर्मिती होते.यातूनच त्वचा पर्यत पोहचणारे सर्व गोष्टी हळूहळू खराब होवून त्वचेत बिघाड निर्माण करून त्वचाविकाराची उत्पत्ती होते.

त्वचा विकार निर्माण होण्यात प्रामुख्याने रस धातु,रक्त धातु,मांस धातु व मेद धातु ची खराब उत्पत्ती प्रामुख्याने असते शिवाय रक्त व पित्त दोषांची खराब उत्पत्ती ही प्रामुख्याने घडते.

अ) पथ्यपालन

वरील त्वचाविकारांच्या सर्व कारणांचे निराकारण करणे म्हणजेच पथ्यपालन होय.यात जुने तांदूळ,फळभाज्या,मूग,मसूर,जुने गहू ,पडवळ,गिलके,दोडके,भोपळा,डांगर,सूरण इत्यादी यासारख्या गोष्टींची गरज असते या विकारात.

ब) औषधोपचार

औषधोपचारांमध्ये आरोग्यवर्धिनी,रक्तपाचक,मांसपाचक,रसपाचक.मेदोपाचक.निंबसाल.खदीरसाल.गुळवेल,गंधक रसायन ,रक्तशुध्दीकर काढे,महामंजिष्ठादी काढा,सूक्ष्मत्रिफळा .त्रिफळा,बावची,सारीवा,मंजिष्ठा,चक्रमर्द,हळद,करंज,वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकारहर लेप,तसेच याच औषधांचे तेल-करंज-निंब तेल इत्यादी  या सारखे अंसख्य औषधे यात वापरली जातात.

क)पंचकर्म

पंचकर्म उपचार त्वचाविकारातील सर्वात महत्वाचे उपचार आहेत,त्वचाविकारात वारंवार पंचकर्म करणे गराजेचे असते.यात

-रक्तमोक्षण

-वमन

-विरेचन या गोष्टी ची गरज पडते.

याकरीता पंचतिक्तक तूप,महातिक्तक तूप,खदीर तूप,कल्याणक तूप,महाकल्याणक तूप,निंब तूप,दारूहळद तूप,महाखदीर तूप,यासारख्या गोष्टी पंचकर्माकरीता वापरल्या जातात.

 ड) रसायन

रसायन म्हणजे काय…तर रसायन म्हणजे आजार बरा झाल्यानंतर झालेला आजार होवूच नये याकरीता करण्याचे उपचार म्हणजेच रसायन होय.वर वर्णन केलेले तूप व त्वचारोगहर अवलेह म्हणजेच चाटून खाण्याचे पदार्थ हे त्वचाविकारात रसायन म्हणून वापरता येतात.

जाता जाता……….

त्वचाविकार अत्यंत चिकट असा विकार आहे.यात रुग्णाने जर अत्यंत चिवटपणे उपचार घेतल्यास त्वचाविकार नक्की बरा होवू शकतो.त्यामुळे समाजाचा विचार न करता योग्य रीतीने उपचार घ्यावे याने त्वचाविकार बरे होवू शकतात.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

मोबाईल -९०९६११५९३०

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.