सोहम तमखाने,अनमोल अरोरा,दर्शन जोपाळे,साहिल पारख,मोहित कटारिया चमकले
नाशिक – महात्मा नगर क्रिकेट मैदानावर १४ वर्षे वयोगटातील एन डी सी ए साखळी स्पर्धे अंतर्गत सामन्यात फ्रावशी क्रिकेट अकादमी चा कर्णधार सोहम तमखाने ने केवळ ५८ चेंडूत फटकेबाज १४५ धावा केल्या. एन डी सी ए मॉर्निंग च्या संघाविरुद्ध १३ उत्तुंग षट्कार व १२ चौकारांसह संघाला २३० धावा उभारण्यात योगदान दिले. डावाच्या १५ व्या षटकात तर सोहमने सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. त्याच्या जोरावर फ्रावशी क्रिकेट अकादमी ने ९६ धावांनी मोठा विजय मिळविला.
तर दुसर्या सामन्यात २२ यार्ड्स च्या अनमोल अरोराने ५ बळी घेऊन , एन डी सी ए आफ्टरनून विरुद्ध २६ धावांनी सामना जिंकुन दिला. तसेच मेरी क्रिकेट क्लब च्या दर्शन जोपाळे ने एन एस एफ ए विरुद्ध ५ बळी घेतले तर नाशिक क्रिकेट अकादमी च्या साहिल पारख व मोहित कटारिया ह्यांनी निवेक व नाशिक जिमखाना विरुद्ध अनुक्रमे १२९ व १२६ धावा केल्या.
सध्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ,गोल्फ क्लब व महात्मा नगर क्रिकेट मैदानावर १४, १६ व १९ अशा विविध वयोगटातील एन डी सी ए लीग २०२१-२२ क्रिकेट स्पर्धा रंगत आहे. १४ वर्षे वयोगटात एकुण १८ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
१४ वर्षांखालील वयोगटातील इतर सामन्यांचे संक्षिप्त धावफलक व निकाल पुढीलप्रमाणे :
१- नाशिक क्रिकेट अकादमी वि. निवेक क्रिकेट अकादमी – नाशिक क्रिकेट अकादमी – ३६५ /६ – साहिल पारख १२९ वि निवेक क्रिकेट अकादमी २६/३ – पावसामुळे सामना अनिर्णीत व दोन्ही संघांना समान गुण
२- फ्रावशी क्रिकेट अकादमी वि कृष्णा क्रिकेट अकादमी – फ्रावशी सर्वबाद ८० वि कृष्णा बिनबाद ८१ – कृष्णा १० गडी राखुन विजयी.
३- एन एस एफ ए वि मेरी क्रिकेट क्लब – एन एस एफ ए सर्वबाद १७१ – दर्शन जोपाळे ५ बळी वि मेरी सर्वबाद ११४ – एन एस एफ ए ५७ धावांनी विजयी .
४- एन डी सी ए आफ्टरनून वि एस जी सी ए – एन डी सी ए आफ्टरनून सर्वबाद १०९ वि एस जी सी ए २ बाद ११० – एस जी सी ए ८ गडी राखुन विजयी.
५- के २१ वि आर व्ही स्पोर्ट्स – के २१ सर्वबाद ९० वि आर व्ही स्पोर्ट्स ३ बाद ९१ – आर व्ही स्पोर्ट्स ७ गडी राखुन विजयी.
६- कृष्णा क्रिकेट अकादमी वि एन डी सी ए मॉर्निंग – कृष्णा सर्वबाद १७६ वि एन डी सी ए मॉर्निंग सर्वबाद ७६. कृष्णा क्रिकेट अकादमी ३७ धावांनी विजयी .
७- एस जी सी ए वि २२ यार्ड्स – एस जी सी ए ३०१ वि २२ यार्ड्स ९४ – एस जी सी ए २०७ धावांनी विजयी .
८- एस ए सी ए वि के २१ – एस ए सी ए १७६ वि के २१ – १७९/६ – के २१ – ४ गडी राखुन विजयी.
९- नाशिक क्रिकेट अकादमी वि. नाशिक जिमखाना – नाशिक क्रिकेट अकादमी ३४५/५ मोहित कटारिया १२६ – नाशिक जिमखाना सर्वबाद १७५ – नाशिक क्रिकेट अकादमी १७० धावांनी विजयी .
१०- अद्वैत क्रिकेट अकादमी वि.आई तुळजाभवानी क्रिकेट क्लब – अद्वैत क्रिकेट अकादमी सर्वबाद १३० वि.आई तुळजाभवानी क्रिकेट क्लब सर्वबाद ६३.अद्वैत क्रिकेट अकादमी ६७ धावांनी विजयी