अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावले पालकमंत्री छगन भुजबळ

0

नाशिक -राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे आज सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते. दरम्यान दर्शन करून परतत असतांना वणी दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झालेला होता. यामुळे प्रचंड वाहतुकीची देखील कोंडी झालेली होती.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांचा ताफा जात असतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपली वाहने थांबवून अपघात ग्रस्त वाहनाच्या ठिकाणी पाहणी करत अपघात ग्रस्तांची चौकशी केली. तसेच याठिकाणी मदतकार्य करत असलेल्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत विचारपूस केली. तसेच या ठिकाणी थांबून सर्व वाहतूक सुरळीत केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!